• Sat. Sep 21st, 2024
Pune Crime: घरफोडी करणारा पुण्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात; असा सापडला जाळ्यात

म. टा. वृत्तसेवा, पुणे (भोर): राजगड आणि हवेली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बंद सदनिका फोडून चोऱ्या करणाऱ्या सराईताला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांना यश आले.

अतुल उर्फ अठ्या चंद्रकांत आमले (वय २८, रा. आकाशनगर, वारजे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सहा लाख ६४ हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. आमलेवर विविध जिल्ह्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. कोथरूड, वारजे, दत्तवाडी, अलीबाग, रावेत पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्याने तेवीस गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

Mumbai News: स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन सप्टेंबर रोजी आमले जामीनावर सुटल्यावर त्याने खेडशिवापूर, नांदेड गाव, डोणजे, हिंजवडी परिसरात घरफोड्या केल्या. राजगड व हवेली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवसा घरफोडी करून दागिने पळवण्याच्या घटनांत वाढ झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अंकित गोयल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, अण्णासाहेब घोलप, सचिन वांगडे, नेताजी गंधारे यांच्या पथकाने घरफोड्या झालेल्या भागातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले.

दिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले असता आमलेवर पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार गोपनीय माहिती व पोलिस पथकाच्या देखरेखीतून खडकवासला परिसरातील धरण चौकात आमले बसल्याची खबर मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पोलिस तपासात राजगड व हवेली हद्दीमध्ये घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. आमलेला पुढील तपासासाठी हवेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Lalit Patil: ड्रग्ज रॅकेटमध्ये मंत्री, पोलिसांचा सहभाग; ललित पाटीलचा एन्काउंटर होईल: रवींद्र धंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed