• Mon. Nov 25th, 2024

    धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत

    धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही कमी होऊन दिलेली नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत २४ ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर संपत आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

    टोकाचं पाऊल उचलू नका, ते समाजाला आणि परिवाराला न परवडणारं, एकनाथ शिंदेंचं मराठा बांधवांना आवाहन

    आज राज्य सरकारने पुन्हा नवीन मराठा आरक्षणाबद्दलची जाहिरात वृत्तपत्रात दिली आहे. यापूर्वी राज्य सरकारने इडब्लूएसबद्दल एक विस्तृत जाहिरात वृत्तपत्रात दिली होती. मात्र, त्यावरुन मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्यामुळे राज्य सरकारने प्रमुख वृत्तपत्रांमध्ये आज एक नवी जाहिरात दिली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जाहिरातीमध्ये मराठा आरक्षणासाठी धोरण आखले असल्याचे सांगण्यात आले आहे. “धोरण आखले आहे..तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे. पुनःश्च… मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे.” असा मजकूर जाहिरातीमध्ये आहे. फ्रंट पेजवर दिलेल्या या जाहिरातीमध्ये वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. तर तळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आहेत. या माध्यमातून राज्य सरकारने कुठेतरी मराठा समाजाला आश्वस्त करत आंदोलन पुन्हा पेटू नये, यासाठी प्रयत्न केले असल्याची चर्चा आहे.

    बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना युवकांचा घेराव, मराठा आरक्षणावर विचारला जाब, अजितदादा सांगितली भूमिका

    राज्य सरकारच्या EWS आरक्षणावर मनोज जरांगे यांची टीका

    मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या (EWS) आरक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता. राज्य सरकारकडून वेळोवेळी ही गोष्ट अधोरेखित केली जाते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी EWS आरक्षणचा पर्याय स्पष्टपणे धुडकावून लावला होता. ईडब्ल्यूएस आरक्षण कुणी मागितलं होतं? बाकीच्यांनाही सारथीसारख्या संस्था आहेत. मग मराठ्यांना वेगळं काय सांगता? मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आला की ईडब्ल्यूएसचा मुद्दा काढला जातो, मात्र या आरक्षणाचा फायदा सर्वांनाच होतो, आमची मागणी मराठा समाजाबद्दलची आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले होते.

    एका आठवड्यात २ मराठा तरुणांच्या आत्महत्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली अस्वस्थता

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *