पुणे: मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे राज्यात दौरे करत आहेत. जरांगे पाटलांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. इंदापूर येथील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवायचे आहे. कोणाचे नाव घ्यायला मी घाबरत नाही. सरकारमधील आपलीच लोक आपल्या विरोधात बोलायला लावायला लागली आहेत. कारण आरक्षणाचा प्रश्न हाता-तोंडाला आला आहे. २४ तारखेपर्यंत कोणाच्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही. २४ तारखेनंतर मराठ्यांशी गाठ आहे. मग बघू कोण कोण येतंय… असा सज्जड दम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
मनोज जरांगे हे इंदापूर मध्ये जाहीर सभेत बोलत होते. यावेळी जरांगे पाटलांच्या सभेला विराट गर्दी झाली होती. जरांगे पुढे म्हणाले की, आरक्षणासंदर्भात अंतरवाली सराटीतील हा हल्ला गावावर नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजावर हल्ला होता. लोकशाही मार्गाने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर सरकारने हल्ला घडवून आणला. असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. तसेच आजही डगमगलो नसून आजही ते आंदोलन सुरू असून तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.

अफगाणिस्ताना पर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले
सरकाराला समाजाच्या संयमाचा विचार करावा लागेल. आम्ही हटणाऱ्यांपैकी मराठा नाही. अफगाणिस्तानापर्यंत मराठ्यांनी झेंडे लावले आहेत. मराठा तुमचा उलटा-सुलटा कार्यक्रम करतील. सरकारने वेळ घेतला आहे आम्ही दिलेला नाही. आम्ही कायदा सोडून बोलत नाही असेही जरांगे म्हणाले.
तरुण-तरुणींनी आत्महत्या करू नयेत
मराठ्यांनी गावोगावी,घराघरात जातं आरक्षण कशासाठी हे समजावून सांगावे. आंदोलनात उद्रेक, जाळपोळ करू नये. मराठा तरुण-तरुणींनी आत्महत्या करू नयेत. तुम्ही आत्महत्या केल्या तर हे आरक्षण कोणाच्या उपयोगाचे असा सवाल त्यांनी केला. जरांगे पाटलांच्या सभेसाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
Read Latest Maharashtra News And Marathi News