जरांगे बारामतीची सभा घेण्याअगोदर पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना हा अमक्याचा बालेकिल्ला.. तो तमक्याचा बालेकिल्ला… असल्याचे सांगितले गेले.. हाच धागा पकडत त्यांनी बारामतीतील सभेत कोणताही बालेकिल्ला कुण्या एकट्याचा नाही तो उपस्थित जनतेचा असल्याचे सांगितले..जरांगे पाटील म्हणाले की, हे राज्य मराठ्यांसह सर्व जाती धर्माचे आहे. आदी आमचे बालेकिल्ले मग तुमचं काय असेल ते नंतर बघू असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली..
या राज्यात मागील ७५ वर्षात जेवढे पक्ष झाले त्या पक्षांच्या नेत्यांना मोठं करण्याचं काम बाप जाद्या मराठ्यांनी केलं आहे. त्यांना मोठे करण्याचे कारण एकच की, त्यांनी कधी जात बघितली नाही .. मग ते येवल्याचे असू.. बीडचे असो बारामतीचा असो… यांच्यात कधीही जात बघितली नाही त्यांची पक्षात मान आणि प्रतिष्ठा वाढविली असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला..
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणा संदर्भातील हे शांततेच्या युद्धामुळे निर्णय प्रक्रियेत आले आहे..हे शांततेच युद्ध सरकारला २४ तारखे नंतर पेलणारे नसेल..त्यामुळे ताकतीने सुरुवात करा गाफील राहू नका. २२ तारखेला आंदोलनाची पुढील दिशा समाजाला सांगणार असल्याचे यावेळी जरांगे यांनी सांगितले.
मंडल आयोगाने ज्या जाती ओबीसी मध्ये घेतल्या, त्यानंतर कायद्याने जेवढ्या जाती ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या आहेत. त्या सर्व जातीचा समावेश पोटजाती म्हणून आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी का नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील जे गरजू नाही, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नसल्यास घेऊ नये, अन्यथा गप्प बसावे. मराठ्यांशी गद्दारी नको असा इशारा सत्तेतील मराठा समाजातील नेत्यांना जरांगे यांनी दिला आहे.