• Sun. Sep 22nd, 2024

पुण्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे विविध सेवा पुरवणारे कर्मचारी सामुहिक बंद पाळणार, कारण…

पुण्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे विविध सेवा पुरवणारे कर्मचारी सामुहिक बंद पाळणार, कारण…

म. टा. प्रतिनिधी,पुणे : मोबाईल अ‍ॅप वरुन सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहेत. पण, त्यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे येत्या २५ ऑक्‍टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह स्विगी आणि झोमॅटोवर सेवा देणारे सर्व कर्मचारी सामुहिक बंद पाळणार आहे, अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ओला-उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर या मोबाईल अ‍ॅपवरून प्रवासी सेवेसह खाद्य पदार्थांची डिलिव्हरी घरबसल्या मिळते. त्यासाठी दिवस-रात्र कर्मचारी काम करत असतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ओला-उबेर वर काम करणाऱ्या चालकांची संख्या दीड लाखांजवळ आहे. तर स्विगी, झोमॅटो, पोर्टरवर काम करणाऱ्या डिलिव्हरी तरुण-तरुणीची संख्या तीस हजाराच्या आसपास आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी असून कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे भारतीय गिग कामगार मंचातर्फे येत्या २५ ऑक्टोबरला अ‍ॅपवर काम करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी बंद पाळणार आहेत, अशी माहिती डॉ. क्षीरसागर यांनी दिली. या संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कपच्या इतिहासात रोहित शर्माचा मोठा विक्रम, एकाही खेळाडूला जमली नाही ही गोष्ट…

सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्या

– राज्य शासनाने गिग वर्कर्स रजिस्ट्रेशन अँड वेल्फेअर अॅक्‍ट (गीग कामगार नोंदणी व कल्याणकारी कायदा) पारित करावा.
– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केंद्र सरकारच्या कॅब ऍग्रीकेटर गाईड लाईन्स २०२० ची अंमलबजावणी करावी.
– खटुआ समितीच्या शिफारशीनुसार रिक्षा व टॅक्‍सी प्रमाणे कॅबचे दर निर्धारित करावेत.
– येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा संमत करून कष्टकऱ्यांना न्याय द्यावा.
निलेश लंके यांचे तळ्यात-मळ्यात सुरूच? अजितदादांच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो आणि आज कट्टर समर्थक…

कर्मचाऱ्यांच्या अडचणी

– चालक आणि डिलिव्हरी बॉईजला कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन किंवा ऑफलाईन सपोर्ट नाही.
– कोणतीही शहानिशा न करता परस्पर आयडीब्लॉक करणे आणि तो सुरू करण्यासाठी दलालामार्फत पैसे उकळणे.
– मॅप मधील अंतर चुकीचे दाखविणे
– कर्मचाऱ्यांना कमी दरावर काम करायला भाग पाडणे
– टुरीस्ट बुकींगमध्ये पांढऱ्या नंबरप्लेट असलेल्या गाड्यांचा वापर करून शासन व प्रवाशांची फसवणूक करणे
– कर्मचाऱ्यांना दाद मागण्याची सुविधा नसणे
जडेजाचा कॅच पाहून बांगलादेशने मॅच जिंकण्याचा विचार सोडून दिला; पाहा बुमराहच्या गोलंदाजीवर नेमक झालं तरी काय

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्या पुलाचा पॅच कोसळला; सेफ्टी इंजिनिअरचा हार घालून सत्कार

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed