• Sat. Sep 21st, 2024
रश्मी ठाकरे येताच फॅन-कूलर बंद होणं नियतीचा खेळ, नितेश राणेंनी सांगितला २००४ मधला किस्सा

सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. यावेळी रश्मी ठाकरे देवीच्या मंडपात शिरताच पंखे, साऊंड आणि कूलर बंद झाले होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच जाणूनबुजून पंखे-कूलर बंद केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. त्यावर ‘हा नियतीचा खेळ आहे’ असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना वीस वर्ष जुन्या किश्श्याची आठवण करुन दिली.

नितेश राणे काय म्हणाले?

रश्मी ठाकरे काल ठाण्यातील टेंभीनाक्यावरील देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या. त्याच वेळी तिथला कूलर आणि फॅन कोणीतरी बंद केला. त्याच्यावर फार जळफळाट झाला, चिडचिड झाली. एका महिलेला घाबरले, असं संजय राऊत बोलताना ऐकलं, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आठवण करुन देतो, की २००४ मध्ये रंगशारदा मध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. तेव्हा बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहणार होते, तेव्हा स्टेजवर नारायण राणे बसू नयेत, म्हणून त्यांची खुर्ची काढून टाकण्याचे आदेश याच उद्धव ठाकरेंनी दिलेले, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला.

कल्याणमध्ये भाजप आमदाराच्या लेकाची राजकारणात एन्ट्री, वैभव गायकवाडांच्या उमेदवारीची चर्चा
असाच काहीसा प्रकार राज ठाकरे यांच्याबाबतही घडला होता. नेत्यांच्या बाजूला लागलेली खुर्ची काढून टाकण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या घरातील व्यक्ती तिथे उपस्थित होत्या, जिथे कूलर आणि फॅन बंद झाला, त्यालाच नियतीचा खेळ म्हणतात. नियती आपापल्या पद्धतीने उत्तर देत असते. तोच प्रकार ठाण्यामध्ये घडला. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी बोललेला नवसही उद्धव ठाकरे पूर्ण करू शकले नाहीत. तो नवस एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फेडला, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

बाळासाहेबांच्या ‘रणरागिणी’ने ४५ वर्षांची साथ सोडली, ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, पक्षांतराचं कारण काय?

नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ टेंभी नाका परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली. यावेळी देवीच्या मंडपातील पंखे, साऊंड व कूलर बंद झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी रेखा खोपकर यांनी केला.

महाराष्ट्राला न्याय देण्याची सद्बुद्धी मिळावी, चंद्रपुरात देवी महाकाली चरणी राहुल नार्वेकरांची प्रार्थना

अरे देवाच्या दारात किती खोटेपणा करणार, याला काही मर्यादा आहेत की नाही, अशी टीका खोपकर यांनी केली. तुम्ही कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही, असे टीकेचे बाण खोपकर यांनी शिंदे गटाचे नाव न घेता सोडले. तसेच खोटेपणाने तुम्ही वागा, देव बघतोय आणि देव यांची प्रचिती काय द्यायची ती देईल. त्यांना कदाचित त्यात सुख मिळालं पण त्यांची लहान मनाची वृती कोत्या मनाची आहे. आज सगळ्या जगाच्या समोर त्यांनी ती दाखवली. त्यांच्या वागण्यातून ते दिसते आहे, अशीही टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली. तर गर्दीमुळे उकाडा वाढल्याचा दावा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केला.

रश्मी ठाकरे येताच फॅन बंद होणं हा नियतीचा खेळ; टेंभीनाक्यातील प्रकारावरून नितेश राणे-संजय राऊतांमध्ये जुंपली

दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या या उत्सवाला दरवर्षी ठाकरे कुटुंबीय भेट देत देवीचे दर्शन घेतात. दिघे यांच्या पश्चात येथील उत्सवाची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांभाळतात.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed