• Mon. Nov 25th, 2024
    राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट-शरद पवार गट; मुख्यमंत्री समर्थक माजी आमदाराची घरवापसी

    कल्याण : अजित पवारांसह ९ दिग्गज नेते आणि आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील त्यांच्याच गटातील माजी आमदार शरद पवारांच्या गटात येत आहे. पांडुरंग बरोरा हे उद्या (गुरुवारी) शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

    पांडुरंग बरोरा हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु २०१९ मध्ये बरोरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर जाऊन हाती शिवबंधन बांधले होते. त्याच वेळी राष्ट्रवादीने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दौलत दरोडा यांना उमेदवारी दिली. दौलत दरोडा यांनी पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला.

    आता तेच दौलत दरोडा हे अजित पवार यांच्या गटात गेल्याने पांडुरंग बरोरा यांची कोंडी झाली. त्यामुळे अखेर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट-शरद पवार गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

    पांडुरंग बरोरा हे शहापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे ४ वेळा शहापूर विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी या मतदारसंघात बरीच विकासकामे केली आहेत. शहापूर मतदारसंघात बरोरा यांचे वर्चस्व आहे.

    २०१९ मध्ये बरोरा यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवत कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अलिकडच्या काळात ते एकनाथ शिंदे गटात होते.

    बोरवणकरांचा हवाला, नितेश राणेंचे नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप; सेना आमदारांची शिंदेंकडे तक्रार
    राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पांडुरंग बरोरा म्हणाले की, शहापूर तालुक्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचसोबत बरोरा कुटुंबाचे शरद पवारांशी जुने ऋणानुबंध आहे. पवारांसोबत आलेल्या कौटुंबिक नात्यांमुळे सध्याच्या परिस्थितीत शरद पवारांना साथ द्यावी असं आमच्या कुटुंबाला वाटते. त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही परततोय असं त्यांनी सांगितले.

    ठाकरे गट कार्यकारिणीचा विस्तार, मात्र मुंबईकर नेत्यांवरच मदार, ग्रामीण भागात नाराजीचा सूर

    नेमकं काय बोलले पांडुरंग बरोरा?

    “सर्व शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी आणि आदरणीय शरद पवार साहेबांना प्रेम. सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मी सर्वप्रथम माफी मागतो की २०१९ ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेलो. खऱ्या अर्थाने ती मी माझी चूक होती आणि म्हणून सर्वप्रथम मी सर्व जनता आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागतो” असं म्हणत पाडुरंग बरोरांनी माफी मागितली.

    वादळं येत राहणार, वैयक्तिक नाती जपुया; रोहित पवारांच्या मातोश्रींची सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट
    “आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनाच एकटे सोडून अनेक जण इतर पक्षासोबत गेले, माझे वडील स्वर्गीय महादू बरोरा आणि शरद पवारांचे १९७८ सालापासून चाळीस वर्षांचे जुने संबंध. शेवटच्या घटकेपर्यंत माझे वडील त्यांच्या सोबत राहिले. ते गेल्यानंतर माझ्याकडून चूक झाली होती, मी त्यांना सोडलं. पवारांबद्दल आमच्या कुटुंबातील आमचे काका यांनी मला सल्ला दिला, की पवार साहेब एकटे पडले आहेत, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, आमचे कुटुंब प्रमुख आमच्या काकांनी भूमिका घेतली आणि मी सर्व कार्यकर्ते-पदाधिकांऱ्यांची भेट घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांना भेटलो, त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी पुन्हा राष्ट्रवादीत पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पांडुरंग बरोरा यांनी दिली.

    विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्ट प्रचंड नाराज, जितेंद्र आव्हाडांची सुनावणीनंतर माहिती

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed