Nanded News: नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जवान सुधाकर शंकर राठोड यांचे अतिथंडी आणि बर्फाच्या प्रभावामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
सुधाकर शंकर राठोड हे १२७ एलटी एडी रेजिमेंट या बटालीयनमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. ते २००६ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ते सध्या लेहमधील सियाचीन भागातील ग्लेशियर येथे बर्फाळ भागात कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असताना अतिथंडी आणि बर्फाचा त्यांना फटका बसला. मेंदूला ऑक्सिजनपुरवठा कमी पडू लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली. लष्कराने त्यांना चंडीगड येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; संविधानाची प्रस्तावना बदलता येते; कोर्टाने थेट संसदेच्या अधिकारावर भाष्य केले
शहीद सुधाकर राठोड यांचे पार्थिव चंडीगड येथून मंगळवारी (ता. २६) विमानाने हैदराबादेत आणले जाणार असून, तेथून रूग्णवाहिकेने पार्थिव जन्मभूमी हिरानगर (ता. मुखेड) येथे आणण्यात येईल. त्यानंतर बुधवारी (ता. २७ रोजी) सकाळी दहाला शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचे बंधू मधुकर राठोड यांनी दिली. सुधाकर राठोड यांच्या पश्च्यात आई धोंड्याबाई, पत्नी आशा राठोड , मुलगा ओम राठोड (वय ८), मुलगी साक्षी राठोड (वय ६) असा परिवार आहे. सुधाकर यांच्या निधनाने त्यांच्या दोन्ही मुलावरील पित्याचं छत्र हरवलं आहे.
Maharashtra CM News: कोण होणार नवा मुख्यमंत्री? ३० तासात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट, असे आहेत नियम
विशेष म्हणजे शहीद जवान सुधाकर राठोड यांची १९ वर्ष ४ महिने झाली होती. पुढच्याच वर्षी त्यांना स्वयं इच्छुक सेवानिवृत्ती घ्यायची होती, मात्र सेवानिवृत्तीच्या काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने मुखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होतं आहे.