• Sun. Sep 22nd, 2024
हव्यास नडला, फी पोटी मालमत्ता लिहून घेणाऱ्या वकिलाची सनद रद्द, कोल्हापुरात प्रकार काय?

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : पक्षकार महिलेचा खटला चालवण्यासाठी मिळणाऱ्या मालमत्तेतील ३३% हिस्सा लिहून घेतल्याबद्दल कोल्हापुरातील रणजीतसिंह सुरेशराव घाटगे या वकिलीची सनद पाच वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली असून पक्षकार महिलेकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत न केल्यास तहहयात सनद रद्द करण्यात येणार आहे.

यावर अधिक माहिती अशी, इचलकरंजी येथील एका महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिचा मालमत्तेवर असलेला अधिकार नाकारला. संबंधित महिलेने या अधिकारासाठी घाटगे यांच्या करवी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा खटला लढण्यासाठी दोन कोटी रुपयेची फी घाटगे यांनी मागितली. त्यातील अकरा लाख रुपये संबंधित महिलेने त्यांना दिले. उर्वरित रक्कम देणे अशक्य झाल्यानंतर घाटगे यांनी मिळालेल्या विषयातील ३३% मालमत्ता देण्याबाबत करार केला.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात; देवस्थान समितीकडून यंदा दहा दिवस दसरा महोत्सव
हा करार केल्यानंतरही पुढे खटला लढवला नाही. याबाबत महिलेने बार कौन्सिलकडे तक्रार केली. सकृत दर्शनी यामध्ये घाटगे दोषी आढळल्याने त्यांची सनद पाच वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा पद्धतीने मिळणाऱ्या मालमत्तेतील हिस्सा लिहून घेणे बेकायदेशीर असल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे घाटगे यांची सनद रद्द करण्यात आली.

निवृत्त अभियंत्यांना राज्य सरकारचा दणका, आधी टक्का, नंतर ठेका, आता लाड बंद…!
याशिवाय संबंधित महिलेकडून त्यांनी घेतलेली अकरा लाखाची रक्कम व्याजासह १४ लाख रुपये देण्याचा आदेशही समितीने दिला. ही रक्कम न दिल्यास घाटगे यांची सनद तहयात रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वकिलावर अशा प्रकारे झालेली ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed