• Sat. Sep 21st, 2024

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार? जाणून घ्या

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार? जाणून घ्या

लोणावळा, पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या दि.१६ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२.०० ते दुपारी १.०० या वेळेत पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.

गॅन्ट्री बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. फक्त कार साठी खोपोली एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट वरून द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या महामार्गावरून प्रवास करणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्याचे श्रध्दास्थान असलेली कार्लाची एकवीरा देवी, आजपासून नवरात्रीला सुरुवात
आतापर्यंत एक्सप्रेस वेवर तीन वेळा असा ब्लॉक घेण्यात आला आहे. काम लवकर संपत असल्याने ब्लॉकची वेळ कमी करण्यात आली आहे. एका तासानंतर हा मार्ग पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर दरडी हटविण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता.

मुंबई – पुणेला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग हा महत्वाचा आहे. या मार्गावरून लाखोच्या संख्येने अनेक नागरिक प्रवास करतात. मुंबई ते पुणे दररोज अनेक नागरिक प्रवास या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. उद्या एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस मागे लागलेल्या ट्रकने ओव्हरटेक केलं; चिमुकल्यानं अपघाताचा घटनाक्रम सांगितला

Read Latest Pune News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed