• Sat. Sep 21st, 2024
Navi Mumbai: ‘सेंट्रल पार्क नको, मुर्बी नाव द्या’; मेट्रो स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई, पनवेल : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या हालचाली सुरू होताच, स्थानिकांकडून स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी सुरू झाली आहे. बेलापूर ते पेंधर या टप्प्यातील खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाला मुर्बी नाव देण्यासाठी शुक्रवारी स्थानिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. लाक्षणिक उपोषण करून सिडको प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

सिडको मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. १० वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झालेल्या मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. खारघर शहरातून तळोजाकडे जाणाऱ्या मेट्रोचा बराचसा भाग खारघर शहरातील आहे. या मार्गावर असलेल्या सेंट्रल पार्कजवळील स्थानकाला सिडकोने सेंट्रल पार्क नाव दिले आहे. या स्थानकाचे नाव बदलून मुर्बी देण्यात यावे, अशी मागणी मुर्बी ग्रामस्थ मंडळाने केली आहे. या मागणीसाठी मेट्रो स्थानकात स्थानिकांनी आंदोलन सुरू केले.

मोठी बातमी: समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात, १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २३ गंभीर
मेट्रोच्या एकूण ११ स्थानकांपैकी सहा स्थानकांना स्थानिक गावांची नावे देण्यात आली आहेत. मग यातून मुर्बी गावाला का वगळण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळेच ग्रामस्थ जगदीश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मंडळांनी आंदोलन केले. ग्रामस्थांनी आंदोलन सुरू करताच सर्व राजकीय पक्ष, सर्वसामान्य नागरिकांनी त्याला पाठिंबा दिला. शुक्रवारी आंदोलकांची भेट घेऊन अनेकांनी पाठिंबा दर्शविला. स्थानिकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविणारे कामगार नेते अॅड. सुरेश ठाकूर यांनीही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

भारत-पाक मॅचआधी हेल्थ चेकअप; सामना संपताच अनेक प्रेक्षक हॉस्पिटलात ‘ऍडमिट’; नेमकं काय घडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed