• Sat. Sep 21st, 2024

बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी? चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक उत्तर

बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी? चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक उत्तर

दौंड : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये बारामतीच्या जागेवर भाजपचा विजयी झेंडा फडकला पाहिजे. मला विश्वास आहे आपण १०० टक्के विजयी होऊ. बारामती लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबियांपर्यंत जाऊन बारामतीत ५१ टक्के मते घेऊन ही लोकसभेची जागा आपण जिंकू, असा तगडा आत्मविश्वास अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..

बारामती लोकसभेच्या उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या चर्चेबाबत पत्रकारांनी छेडले असता बावनकुळे म्हणाले, भाजपची केंद्रीय समिती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सगळे नेते लोकसभेचा उमेदवार ठरवतील. मात्र महायुतीचाच उमेदवार ५१ टक्के मते घेऊन १०० टक्के बारामतीतून निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागच्या निवडणुकीपेक्षा दीडपट अधिकची मते मिळवण्याची तयारी बारामती लोकसभा मतदारसंघात चालू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘बारामती’च्या बदल्यात पालकमंत्रिपद? भाजप आणि अजितदादांचं डील काय? चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सोबत येत असतानाच सांगितले होते की, देशाला सर्वोत्कृष्ट बनवणारे नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. हा विचार घेऊन त्यांनी महायुती सोबत येण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचवेळी पुण्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच जाणार हे तेव्हाच ठरले होते, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

अजितदादांच्या तन मन धनामुळे सुप्रियाताई खासदार, मिटकरींच्या वक्तव्यावर सुळेंचा जोरदार पलटवार
भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांच्या नेतृत्वातील सरकार निवडून यावं आणि बारामती लोकसभा महायुतीने जिंकावी. बारामतीसह महाराष्ट्रातील ४५ हून अधिक जागा या महायुतीने जिंकाव्यात, याच उद्दिष्टाकरिता अजितदादा महायुतीत आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

हे ३ पक्षांचं सरकार, छोटं-मोठं काहीतरी होत राहणार; अजितदादांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा सावध पवित्रा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed