• Sat. Sep 21st, 2024

अपहरण केलं, मग भयानक पद्धतीने संपवून कालव्यात फेकलं, तरुणाच्या मृत्यूमागील कारण ऐकून हादराल

अपहरण केलं, मग भयानक पद्धतीने संपवून कालव्यात फेकलं, तरुणाच्या मृत्यूमागील कारण ऐकून हादराल

स्वप्नील एरंडोल, सांगली: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटना वाढत आहेत. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हाट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवित असल्याचा राग मनात धरून कवठेमहांकाळ शहरातील एका तरुणाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. तब्बल सात दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला लेकाचा मृतदेह पाहून आईने आक्रोश केला.

सुशिल सुर्यकांत आठवले (वय २३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे अपहरण करुन पाच जणांनी त्याचा खून करून म्हैसाळच्या कालव्यात टाकलेला मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला. सातव्या दिवशी लंगरपेठ गावच्या हद्दीत म्हैसाळ योजनेच्या बोगद्यातील विहिरीत सदर युवकाचा मृतदेह सापडला. या खुनाप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ शहरामधील २३ वर्षीय तरुणाला कवठेमहांकाळ येथील जनावरांच्या बाजारातील शेडजवळ लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यास खाजगी अॅम्बूलन्स मधून काही अंतरावर नेवून मारहाण व खून करून मृतदेह लोखंडी पुलावरून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकला होता. दरम्यान, पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपण खून केला असल्याची कबूली दिली.

बर्थडेचा केक कापायला आला नाही, मित्रावर चाकूने सपासप वार, उल्हासनगरमधील थरारक घटना

मृतदेहच सापडला नसल्याने पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करता आला नव्हता. गुरुवारी मेघा सुर्यकांत आठवले यांनी आपला मुलगा सुशिल हा बेपत्ता झाला असल्याची फिर्याद दिली. मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर या पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. चैतन्य नामदेव माने व सुनिल मारुती माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तर अनुज अमृत माने, अनिल मारुती माने व ऑल्विन संजय वाघमारे या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक करण्यात आली.

दोन संशयित आरोपींनी आपण सुशिल आठवलेचा खून केल्याची कबूली दिल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून पोलीस म्हैसाळच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होते. म्हैशाळ योजनेच्या कालवाच्या बोगद्यात तपास केलाअसता अखेर सातव्या दिवशी लंगरपेठ गावात म्हैसाळ योजनेच्या कालव्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यावेळी १२० फूट खोल अंतरा वरील बोगद्यात सुशिलचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बचाव पथकास बोलावून रात्री मृतदेह वर काढण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जळगावात अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; खून करून मृतदेह गुरांच्या गोठ्यातील चाऱ्यात लपवला

Read Latest Sangli News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed