शहरात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानंतर अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शहरातील या परिसरात पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले. या परिसरातील रहिवाशी रामगोपाल बचुका, जयश्री बनसोड आणि नत्थुजी टिक्कस यांनी त्यांचे वकील तुषार मंडलेकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, या परिसरातील विवेकानंद स्मारकामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने हे स्मारकसुद्धा हटविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
याखेरीज तसेच अंबाझरी तलाव व या परिसरातील नियोजन तसेच विकासाशी निगडित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या याचिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानुसार, या परिसरातील विवेकानंद स्मारकामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने हे स्मारकसुद्धा हटविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
पुरानंतर ‘मटा’ने या सर्व विषयांचा उहापोह केला होता, हे विशेष. मनपा, नासुप्र आणि महामेट्रो या तिन्ही प्रशासनांनी या परिसरात केलेली बांधकामे चुकीची आहेत. त्यामुळे या परिसरात पूर आला व हजारो नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात सध्या कार्यरत असलेल्या तीन न्यायमूर्तींची चौकशी समिती नियुक्त करावी. या समितीने तपास करून या नुकसानाची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणीही जनहित याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर आणि वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यात न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली.
Read Latest Maharashtra News And Marathi News