• Mon. Nov 11th, 2024

    ललित पाटील तुमच्या ताब्यात होता, तुम्हाला नीट सांभाळता आलं नाही का? कोर्टाने पुणे पोलिसांना खडसावले

    ललित पाटील तुमच्या ताब्यात होता, तुम्हाला नीट सांभाळता आलं नाही का? कोर्टाने पुणे पोलिसांना खडसावले

    पुणे : ड्रग्स तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील सह अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे सत्र न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्ती वाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला आहे. मात्र मुख्य आरोपी ललित पाटील पोलिसांच्या हातून पळून गेल्यानंतर तुम्ही इतर लोक गोळा करून काय तपास करणार आहे ? थेट सवाल करत न्यायाधीश बिराजदार यांनी पोलिसांचे कान टोचले आहेत.

    ससून रुग्णालयात ड्रग्स तस्कर ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ललित पाटील गेल्या ९ महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. ससून रुग्णालयातून तो त्याची सूत्रं फिरवत ड्रग्सची तस्करी करत होता. याची माहिती अंमली पदार्थ पथकाच्या पोलिसांना मिळाली होती.

    त्यानंतर अंमली पदार्थ च्या विशेष पथकाने २ कोटींचे मेफेड्रोन ड्रग्स ससून रुग्णालयाच्या दारातून जप्त केले होते. त्यासोबत दोन आरोपींना अटकही केली होतं. मात्र त्याच्या रात्री ललित पाटील रुग्णालयातून फरार झाला होता. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर मोठी टीकादेखील झाली. यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.

    अपहरण केलं, मग भयानक पद्धतीने संपवून कालव्यात फेकलं, तरुणाच्या मृत्यूमागील कारण ऐकून हादराल
    भूषण पाटील (भाऊ) अभिषेक बलकवडे (साथीदार) दत्ता डोके (ड्रायव्हर) सुभाष जानकी मंडळ(ड्रग्स तस्कर) रौफ रहीम शेख( ड्रग्स तस्कर) या पाच आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी ललित पाटील अद्याप फरार आहे.

    आरोपी भूषण पाटीलसह त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला अटक केली आहे. त्यांची आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होती. सुनावणी दरम्यान न्यायाधीश बिराजदार यांनी पोलिसांच्या कामगिरीवर विशेष टिप्पणी करत पोलिसांचे कान टोचले आहेत. ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना तुम्हाला त्याला सांभाळता आलं नाही तो पळून कसा गेला. आता या आरोपींना गोळा करून तुम्ही काय चौकशी करणार आहे? असे पोलिसांना ठणकावत फक्त ५ दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.

    आम्ही मुलांकडे लक्ष देऊनही असं झालं; ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलच्या आईची खंत

    Read Latest Pune News and Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed