• Mon. Nov 25th, 2024
    चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद? डीएनए चाचणी होणार, वनविभाग अलर्ट

    जुन्नर: चार दिवसांपूर्वी शिवांश भुजबळ या चार वर्षांच्या बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याच्या शोधासाठी लावलेल्या १५ पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात एक मादी बिबट्या पहाटे जेरबंद झाला आहे.त्याचे रक्ताचे नमुने हैद्राबाद येथील(सीसीएमबी) पेशीविज्ञान आणि रैणवीय जीवशास्र केंद्रात पाठविण्यात आले आहेत.या नुमन्याच्या चाचणीनंतर आरुषचा बळी घेणारा बिबट्या हाच होता का यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहीती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी मटाला दिली.

    शिवांशच्या बरोबरच जुन्नर वनविभागाच्या क्षेत्रात गेल्या ९ महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेला हा पाचवा बळी आहे.त्यामुळे या घटनेने लोकभावना तिव्र असल्याने वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.ज्या तितर मळा परिसरात ही घटना घडली त्या परिसरात १५ पिंजरे लावण्यात आले आहेत.१५ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून दिवसा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्यांची शोधमोहीमही सुरु आहे.पायी पेट्रोलिंगसाठी दिवसा २० आणि रात्रपाळीत २० असे ४० वनकर्मचारी गस्त घालत आहेत.

    आई लढली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याला बाहेर काढलं; पुणे जिल्ह्यातील घटनेची चर्चा
    दहा लाखांची मदत सुपूर्द:
    शिवांशच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून १० लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला आहे.आणखी १५ लाखांची मदत तातडीने दिली जाणार आहे.

    -वैभव काकडे(वनपरिक्षेत्र अधिकारी ,जुन्नर)

    ९ महिन्यात पाचवा बळी..
    वनविभागाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या ९ महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या आरुषच्या मृत्युमुळे पाच झाली आहे.जानेवारी ते एप्रिल या सलग चार महिन्यात चार बळी गेले.तर शिवांशच्या रुपात पाचवा बळी गेला असून एकूण ११ जण आतापर्यंत जखमी झाले आहेत.

    बिबट्या बाळाला ओढत होता, आईनं सांगितला थरारक अनुभव

    Read Latest Pune News and Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed