• Mon. Nov 25th, 2024

    लेह येथे बर्फाळ भागातील दुर्घटनेत साताऱ्याचे जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण

    लेह येथे बर्फाळ भागातील दुर्घटनेत साताऱ्याचे जवान शंकर उकलीकर यांना वीरमरण

    सातारा: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वसंतगड (ता. कराड) येथील शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) हे जवान शहीद झाले आहेत. लेह येथे सोमवार, दि. ९ रोजी बर्फाळ भागात एका दुर्घटनेत शंकर उकलीकर यांना वीरमरण आले आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच वसंतगड परिसरात शोककळा पसरली आहे. शंकर उकलीकर हे सैन्य दलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी उद्या येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    शंकर उकलीकर यांचे शिक्षण वसंतगड येथे जिल्हा परिषद आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत शंकर उकलीकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सन २००१ साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी २२ वर्ष सेवा बजावली होती. त्याच्या पश्चात आई, भाऊ- भावजय, पत्नी, आर्या ही ६ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. वसंतगड येथील डोंगराच्या पायथ्याशी अंत्यसंस्कार करण्याची पूर्वतयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.

    नागपुरात खोदकाम करताना देवीचा मुखवटा निघाला, व्हिडीओ व्हायरल होताच भाविकांची तुफान गर्दी
    दरम्यान, उकलीकर यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात येणार आहे. तेथून पार्थिव त्यांच्या गावी वसंतगड येथे आणण्यात येणार आहे. नायब सुभेदार उकलीकर शंकर बी यांचे पार्थिव पुणे येथे पोहोचण्याची वेळ नंतर कळविण्यात येईल, असे सैन्य दलाकडून मिळालेल्या संदेशात म्हटले आहे.

    शहिद वडिलांना चिमुकल्यानं मुखाग्नी दिला, अख्ख्या गावाचा कंठ दाटला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *