• Sat. Sep 21st, 2024
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन विहिरीवर गेलेल्या भाविकांना विहिरीत पाणी नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. अखेर मूर्ती विसर्जनासाठी त्यांना तलावाकडे जावे लागले.

महापालिकेने शहरातील विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेसाठी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकानुसार विहिरींची स्वच्छता करण्यात आली. काही विहिरींची स्वच्छता सुरूच आहे. विहिरींच्या स्वच्छतेबरोबरच विहिरींमध्ये पाणी टाकण्याची जबाबदारीही महापालिकेचीच आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

पंचगगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले, त्या वेळीही विहिरीत पाणी नव्हते. शनिवारी पाणी असेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, शनिवारीही बहुतेक विहिरींमध्ये पाणी नव्हते. त्यामुळे ‘श्रीं’ची मूर्ती घेऊन विहिरीवर आलेल्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रामुख्याने जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरीकडे अनेक भाविक आले होते. मात्र, पाणी नसल्यामुळे त्यांना हर्सूल तलाव, सावंगी तलावाकडे जावे लागले. लाखो रुपये खर्च करुन विहिरींच्या स्वच्छतेचे काम केले जात असताना विहिरीमधील पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.

पंतप्रधान २४ तास ओबीसींबाबत बोलतात मग जातगणनेची भीती का वाटते? राहूल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed