• Mon. Nov 25th, 2024

    पुण्याला पावसानं झोडपलं, रस्त्यांवर जागोजागी पाणी, पुढील चार दिवसही पावसाचे, IMD चा इशारा

    पुण्याला पावसानं झोडपलं, रस्त्यांवर जागोजागी पाणी, पुढील चार दिवसही पावसाचे, IMD चा इशारा

    पुणे : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुण्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यात आज दुपारी २ च्या सुमारास शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरात ठिकठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाहनधारकांनी साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करणं पसंत केलं. कर्वेनगरमध्ये देखील रस्त्यावर पाणी साचलं होतं. तर, दुसरीकडे खराडीत एका ठिकाणी गुडघाभर पाणी जोरदार पावसामुळं साचलं होतं.

    आज सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. आज दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. तर, शुक्रवारी चार ते पाच वाजता मध्यम पाऊस झाला होता. अचानक पावसानं हजेरी लावल्यानं छत्री, रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल उडाली.

    भारतीय हवामन विभागाच्या पुणे विभागाच्या अधिकारी स्मिता आपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असल्यानं द्रोणीय स्थिती ईशान्य मध्य प्रदेश ते मध्य नैऋत्य बिहार पर्यंत आहे. त्यामुळं पावसानं हजेरी लावली आहे. २४ ते २५ सप्टेंबर रोजी मान्सून सक्रीय ते अतिसक्रीय राहील, अशी माहिती त्यांनी दिली.
    विक्रम, प्रज्ञानकडून सिग्नल मिळेना; मिशन चांद्रयान-३चं पुढे काय? ISROनं दिलं उत्तर
    २६ तारखेनंतर अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्यानं मान्सून महाराष्ट्रात आणखी सक्रीय होण्याची शक्यता आहे

    राज्यात आज तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडू शकतो. तर, २७ तारखेला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

    निवृत्त अभियंत्यांना राज्य सरकारचा दणका, आधी टक्का, नंतर ठेका, आता लाड बंद…!
    हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज पुण्याचं आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. २६ सप्टेंबर हलक्या स्वरुपाचा, घाट विभागात मुसळधार तर २८ सप्टेंबरला हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, राज्यात आज नागपूर, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे.
    Nagpur Rain: नागपुरात तुफान पाऊस, सगळीकडे दाणादाण, फडणवीसांनी मुंबईतून सूत्रे फिरवली, यंत्रणा हलली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *