• Wed. Jul 8th, 2026

    विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 16, 2026
    विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन – महासंवाद

    नागपूर, दि. 16 : विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

    नुकतीच विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली व या निवडणुकीत डॉ. गिरीष गांधी हे बहुमताने निवडून आले. या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश मुळे यांनी त्यांच्या रवीनगर भागातील कार्यालयात भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

                यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चे दरम्यान डॉ. गांधी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पुढील वाटचाली विषयीची योजना सांगितली. डॉ. मुळे यांनी साहित्य संघाच्या आगामी कार्यक्रमात पत्रकारांसाठीही विशेष कार्यक्रम घ्यावेत असे यावेळी सूचविले. माहिती अधिकारी रितेश भुयार, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिद्धी समन्वयक अविनाश महालक्ष्मे यावेळी उपस्थित होते. त्यांनीही डॉ. गांधी  यांचे अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या.

      00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed