• Mon. Mar 16th, 2026
    Crime News : पतीला साडीने आवळलं अन् बायकोच्या डोक्यात…; चोरट्यांनी ७ लाखांसाठी केलं भयंकर कृत्य

    अहमदनगर : घरात असलेल्या पतीचा साडीने गळा आवळून पत्नीच्या डोक्यात बॅटरी टाकून जखमी करुन घरातील सात लाख रुपयांची रोकड घेउन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. या धक्कादायक घटनेत साडीने गळा आवळल्याने व्यावसायिक नईम पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदरची घटना बुधवारी मध्य रात्री

    अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात घडली असून सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरांच्या मारहाणीत नईम पठाण यांच्या पत्नी बुशरा गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    राज्यात या जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; घरात कंबरेपर्यंत पाणी, ऐन गणेशोत्सवात कहर
    याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नईम पठाण यांनी जागेच्या व्यवहारासाठी ७ लाख रुपये घरी आणले ते कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी. बुधवारी २० सप्टेंबरच्या मध्य रात्री दोनच्या सुमारास नईम यांच्या पत्नी बुशरा यांनी घराबाहेरील बाथरूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच दबा धरून बसलेले चोर आत आले. त्यांनी नईम व त्यांची पत्नी बुशरा यांना त्यांनी जबर मारहाण केली.

    चोरांनी घरातील ओढणीने नईमच्या गळ्याला बांधून फास आवळला. त्यात नईमचा मृत्यू झाला व घरातील सात लाख रुपये घेऊन चोरांनी पळ काढला. याबाबत नईम पठाण यांचे सासरे अन्वर चिराग शेख यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपुर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहे.

    Maharashtra Rain Alert : राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *