• Sat. Sep 21st, 2024

Chandrapur: चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा; चंद्रपूर हादरलं

Chandrapur: चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा; चंद्रपूर हादरलं

चंद्रपूर: चंद्रज्योतीच्या (जट्रोपा) बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा झाल्याची घटना जिवती तालुक्यात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .विषबाधित बालकांवर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्व बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. मनीषा माणिकराव कोडापे (3), यतमा संजय कोडापे (३), नागू गंडू कोडापे (४), शामू गंडू कोडापे (२), विष्णू बारीकराव सिडाम (२), आदर्श कर्ण सिडाम (२), कृष्णा बारीकराव सिडाम (२) अशी बालकांची नावे आहेत.

भारतात अंगणवाडी केंद्रांतील ४३ लाख बालके लठ्ठ; कोणत्या राज्यात प्रमाण कमी, कुठे जास्त? जाणून घ्या

प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील लांबोरी येथील अंगणवाडी इमारतीच्या बाजूला चंद्रज्योतीचे झाड आहे. अंगणवाडी परिसरात खेळत असताना या मुलांचे लक्ष त्या झाडावर गेलं. त्यांनी बिया खाल्ल्या.काही वेळात त्यांना उलट्या होऊ लागल्या. मुलांना तात्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उप केंद्रात कुणीच उपस्थित नव्हते.तिथून जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांना भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मुलांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथं बालकांवर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अंगणवाडी मदतनीसांच्या जागांसाठी उच्चशिक्षित महिलांचे अर्ज; इंजिनीअर्सचाही सहभाग

केवळ नावाचाच तालुका

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. तालुका समस्यांचे माहेरघर बनले आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुका स्थळी ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी झाली आहे. पण केवळ शोभेची वास्तू बनली आहे. जिवती तालुक्यात आदिवासी कोलाम बांधवांची संख्या मोठी आहे. या बांधवांना आरोग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

जनावरांनाही देऊ नये असा निकृष्ट दर्जाचा आहार; अंगणवाडीतील हजारो लेकरं अन् स्तनदा मातांच्या आरोग्याशी क्रूर खेळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed