• Sat. Sep 21st, 2024

विघ्न टळलं! कुटुंबाचा एक निर्णय अन् जाता जाता त्याने दिले तिघांना नवे आयुष्य

विघ्न टळलं! कुटुंबाचा एक निर्णय अन् जाता जाता त्याने दिले तिघांना नवे आयुष्य

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: वर्धा येथील तरुणाच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या अवयवदानामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तीन तरुणांवरील विघ्न टळून त्यांना नवे आयुष्य मिळाले आहे.

वर्धेच्या गांधीनगर परिसरात राहणारे श्रीकांत पांडे (वय ४७) हे खासगी नोकरी करायचे. दोन दिवसांपूर्वी त्यांना घरीच अस्वस्थ वाटायला लागले आणि ते कोसळले. यात त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यामुळे त्यांना सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने १९ सप्टेंबर रोजी डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. संदीप इरतवार, डॉ. अमोल आंधळे यांच्या पथकाने त्यांना मेंदूमृत घोषित केले.

बायकोची नायटी अन् विग घातला, मग असं काही केलं की पोलिसही चक्रावले
तेथील डॉ. विठ्ठल शिंदे यांनी कुटुंबीयांचे अवयवदानाविषयी समुपदेशन केले. त्यानंतर त्यांनी संमती देताच नागपूरला झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरला (झेडटीसीसी) कळविण्यात आले. या केंद्राचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादीनुसार अवयवदान निश्चित केले.

त्यानुसार यकृत नागपूरच्या ॲलेक्सिस रुग्णालयातील ३७ वर्षाच्या तरुणाला देण्यात आले. एका किडनीचे प्रत्यारोपण सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल २९ वर्षाच्या तरुणावर तर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण ॲलेक्सिसमधील ४० वर्षाच्या तरुणावर करण्यात आले. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी या अवयवदानासाठी पुढाकार घेतला.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed