पीएमपीकडून महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीकडून ७० बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. पीएमपीच्या ताफ्यात आता नवीन सीएनजी आणि लक्झरीस असलेले ई-बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांचा बसला चांगला प्रतिसादही मिळत असून, पुणेकरांना माफत दरामध्ये लग्न समारंभासह अन्य कार्यक्रम किंवा आयटी कंपनी, हॉस्पिटल, खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी तसेच शहर आणि आसपासच्या परिसरात सहलीसाठी बस उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.
पीएमपीचे सोमवार ते शनिवारी दरम्याचे दर रूपयांमध्ये
तपशील सीएनजी दर ई-बस दर
आठ तासांसाठी जीएसटीसह ८४६९ ९९५१
१६ तासांकरिता जीएटीसह १६९४० १९९०३
प्रस्तावित दराच्या ५० टक्के ४२३४ ४९७५
याप्रमाणे सोडणे किंवा आणणे
पीएमपीचे रविवारचे दर रूपयांमध्ये
आठ तासांसाठी जीएसटीसह ६३५२ ७४६३
१६ तासांकरिता जीएटीसह १२७०५ १४९२७
प्रस्तावित दराच्या ५० टक्के ३१७६ ३७३१
याप्रमाणे सोडणे किंवा आणणे