• Mon. Nov 11th, 2024
    कोकणात जाताय तर ही बातमी वाचा; वसई, विरार अन् पालघरमधून ६०२ एसटी बसेस, कधी सुटणार गाड्या?

    पालघर : गौरीगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन विभागाच्या पालघर जिल्ह्याच्या विभागीय नियंत्रण कार्यक्षेत्रातून आज, उद्या आणि परवा तब्बल ६०२ बसगाड्या कोकणातील विविध गावे व तालुक्यांच्या ठिकाणी सोडणार येणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळीही १५ एसटी बस रवाना करण्यात आल्याचे विभाग नियंत्रण कार्यालयातून सांगण्यात आले.

    नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले कोकणवासी गणेशोत्सवासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आपल्या गावी मोठ्या संख्येने जात असतात. या प्रवाशांसाठी विशेष सुविधा राज्य परिवहन विभागाच्या पालघर विभाग नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आली असून बहुतांश बस आरक्षण पूर्ण होत आले आहे. विभागातर्फे १६, १७ आणि १८ सप्टेंबरपासून सलग तीन दिवस या बस सोडण्यात येणार आहेत.

    पर्यटकांसाठी गुड न्यूज; मरीन ड्राईव्ह सुशोभिकरणाचा श्रीगणेशा, ‘या’ परिसरांचा हेरीटेज विकास होणार
    राज्य परिवहन विभागाच्या पालघर विभाग नियंत्रण कार्यालया अंतर्गत असलेल्या मनवेल पाडा बस स्थानक येथून ३२०, तर नालासोपारा बस स्थानकातून २५० बस रवाना होणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी १५ बस रवाना झाल्या. आज, १६ सप्टेंबर रोजी ४४६, १७ सप्टेंबर रोजी ९५ आणि १८ सप्टेंबर रोजी ४० बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत.

    ४८८ बसचे ग्रुप बुकिंग

    राज्य परिवहन विभागाकडे ऑनलाइन आरक्षण तसेच ग्रुप बुकिंगही करण्यात आले आहे. कोकणात जाण्यासाठी ४८८ बसगाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले असून त्याव्यतिरिक्त ११६ बसगाड्यांचे वैयक्तिक प्रवाशांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

    कोकणातील गुहागरसाठी २००, राजापूर ४०, साखरपा १०, श्रीवर्धन ३०, रत्नागिरी १९, खेड २०, तसेच बिलवली, आंबेवडे, म्हसळा, केळशी, वीरसई, कुडाळ, आंजर्ले, खुटील, बोलवडी, निगडी, खरवते, कासे मारवजण या ठिकाणी साधारण प्रत्येकी एक ते तीन बसगाड्या या तीन दिवसांत सायंकाळी ४ ते रात्री १२ या वेळेत सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी याचा फायदा घेऊन राज्य परिवहन विभागाच्या बसने सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

    पवना धरणातील बंदिस्त जलवाहिनीविरोधात शेतकरी आक्रमक; भाजप नेत्याचा सरकारला इशारा, म्हणाले..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed