मुंबई : राज्यात गेल्या २ दिवसांपासून पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी अद्यापही चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा राज्यामध्ये एल निनोचा प्रभाव असल्यामुळे अद्यापही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. अनेक जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाची आणि चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. अशात पुढील ४-५ दिवस राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळेल. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यामुळे राज्यात पावसाचे वारे वाहतील. त्यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather Alert : राज्यावर उद्या अस्मानी संकट, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती आहे. मुंबई आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या २ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो आहे. तर उत्तर महाराष्ट्रादेखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि भागात पाऊस सक्रिय होईल. यावेळी राज्याच्या अन्य भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस १८ सप्टेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागात बरसेल. त्यानंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा कमी होईल, असं हवामान खात्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे.
Maharashtra Weather : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय, १८ सप्टेंबरपर्यंत या भागांत बरसणार…