• Sat. Sep 21st, 2024
स्वस्तात सोन्याचे आमिष, व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा, माफिया क्वीन बेबी पाटणकर पुन्हा रडारवर

मुंबई : ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अडचणीत आलेली बेबी उर्फ शशिकाला पाटणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेले सोने स्वस्तात देतो सांगून बेबी आणि तिच्या साथीदाराने व्यापाऱ्याला तब्बल दोन कोटी रूपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाकरिता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी बेबी पाटणकर या नावाने मुंबई पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या मदतीने अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी बेबी हिला अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. हीच बेबी आता पोलिसांच्या पुन्हा रडारवर आली आहे.

पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय, ५० वर्षीय वन कर्मचाऱ्याने जीव गमावला, २७ वर्षीय भाजी विक्रेत्याला अटक
एका ६० वर्षीय व्यापाऱ्याची त्याच्या परिचयातील व्यक्तीने पुण्याच्या परशुराम मुंडे या व्यक्तीसोबत ओळख करून दिली. मुंडे याने व्यापाऱ्याला त्याची आर आर गोल्ड नावाची पुणे येथे कंपनी असल्याचे सांगून ते सोने खरेदी विक्री करीत असले बाबत सांगितले. कस्टम येथे पकडलेले सोने लिलावात कमी दरात खरेदी करून बाजार भावापेक्षा कमी दरामध्ये विकतात असे सांगितले होते. त्यावर व्यापाऱ्याने विश्वास ठेवून त्यांचे कडून सोने खरेदी करण्यास ते तयार असल्याचे सांगितले.

शेअर रिक्षा प्रवासात महिलांसोबतच्या गैरप्रकारांना आळा बसणार, ही आयडिया वाचून तुम्हीही म्हणाल वाह वाह!
वरळी येथील भिवंडीवाला बिल्डींगमध्ये मुंडे यांनी व्यापाऱ्याला बेबी पाटणकर हिच्या घरी नेले. बेबी हिने त्याला सुमारे सात किलो सोने दाखवले. त्यानुसार व्यापाऱ्याने आधी सुमारे एक कोटी ३० लाख दिले आणि नंतर ७० लाख रूपये दिले. दुसऱ्या दिवशी सोने देते सांगून बेबी गायब झाली. त्यानंतर व्यापाऱ्याने माहिती काढली असता बेबीवर अनेक गंभीर गुन्हे असल्याचे समजले. व्यापाऱ्याने याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा करून बेबी आणि परशुराम मुंडे याच्या विरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

पुन्हा नशा करणार नाही’ अशा घोषणा द्यायला लावून पोलिसांनी काढली नशाबाजांची धिंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed