• Sat. Sep 21st, 2024

कागदपत्रांसाठी दोन आठवडे द्या, आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाची मागणी, नार्वेकर म्हणाले…

कागदपत्रांसाठी दोन आठवडे द्या, आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाची मागणी, नार्वेकर म्हणाले…

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या वकिलांनी बाजू मांडली. यावेळी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने, आपल्याला याचिकेशी संबंधित कागदपत्रेच मिळाली नसल्याचे सांगत त्यांचा अभ्यास करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतही मिळा, अशी मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.

सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. ‘मी ज्युडिशिअल ऑथॉरिटी म्हणून काम करत असतो. त्यामुळे त्यावर बाहेर बोलणे योग्य नाही. ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांना करू द्यात’, अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

‘न्यायप्रविष्ट विषयात बोलणे योग्य नाही. विधानसभेच्या नियमांनुसार निर्णय दिला जाईल. राज्यघटनेतील तरतुदींचे पालन करून योग्य निर्णय घेऊ. प्रक्रियेचे पालन करू. पुढच्या सुनावणीबाबत योग्य निर्णय घेऊन याचिकाकर्त्यांना सांगू’, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही गटांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दावे-प्रतिदावे केले.
अनिलबाबूंनी सोसले, मी मात्र भोगेन; विजय वडेट्टीवारांचं बेधडक वक्तव्य, असं का म्हणाले?
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘भरत गोगावले हे प्रसारमाध्यमांपुढे दिशाभूल करणारी विधाने करत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेच सुनील प्रभू हे व्हिप असल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदे गटाकडून करार झाला. आधी आम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत, असे सांगितले गेले. त्याचवेळी सहा हजार पानांचे उत्तर त्यांनी दाखल केले आणि एक अक्षरही आम्हाला मिळाले नाही, असेही ते सांगत आहेत. त्यामुळे हे बोलणे चुकीचे आहे. एवढा वेळ मिळूनही आता आणखी १४ दिवसांचा वेळ दिला आहे. कागदांचे आदानप्रदान होईल. पुढच्या वेळी अध्यक्ष महोदय याबाबत निर्णय घेतील आणि ‘शेड्युल १०’प्रमाणे हा निर्णय देतील. आम्हाला न्याय मिळेल. सत्यमेव जयते’, अशी प्रतिक्रिया प्रभू यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed