५ वर्षे प्रेमसंबंध होते…
नयनाचे वसई येथे राहणारे मनोहर रविशंकर शुक्ला (४३) यांच्याशी गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही वर्षांपूर्वी नयनाला मनोहरचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला होता. नयनाने वालीव पोलीस ठाण्यात त्याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. हाच खटला मागे घेण्यासाठी शुक्ला त्यांच्यावर दबाव आणत होते.
९ ऑगस्ट रोजी नयनाचा फोन अचानक बंद आला. त्यांची मोठी बहीण जया महात हिने नातेवाईक व ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. मात्र, कोणताही पत्ता लागला नाही. १४ ऑगस्ट रोजी जयाने नायगाव पोलीस ठाण्यात नयना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी अहवाल नोंदवला. मात्र, प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप आहे. जया पोलीस स्टेशनला चकरा मारत राहिल्या. त्यांनी पोलिसांना इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पाहून मनोहरची चौकशी करण्यास सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुक्ला एक सुटकेस घेऊन जाताना दिसले.
कुजलेला मृतदेह सापडला…
येथे पार्डी पोलिसांना नयनाचा कुजलेला मृतदेह खाडीकिनारी एका सुटकेसमध्ये सापडला. नयनाची ओळख तिच्या हातावरील टॅटूवरून झाली. मनोहर आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नयनाचा पाण्याच्या टबमध्ये बुडवून खून केल्याचे सांगितले.