• Mon. Nov 25th, 2024

    सांगलीत थरार! नदीत इअरप्लग घालून स्वीमिंग; तरुणाच्या समोर मगर येताच लोकांचा आरडाओरडा अन्…

    सांगलीत थरार! नदीत इअरप्लग घालून स्वीमिंग; तरुणाच्या समोर मगर येताच लोकांचा आरडाओरडा अन्…

    सांगली: कृष्णा नदी पात्रात मगरींचा असणारा वावर ही नित्याची बाब आहे. मात्र, बुधारी सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर थरारक घटना घडली. नेहमीप्रमाणे शहरातील जलतरणपटू नदी मध्ये पोहण्यासाठी गेले. याच वेळी एक अजस्त्र मगर पाण्यात फिरत होती. समोर मगर असताना हा जलतरणपटू त्या मगरीच्या दिशेने पोहत निघाला होता. सदरची घटना काठावरील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड करून त्या जलतरणपटूस वेळीच सावध केले आणि पुढील दुर्घटना टळली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही चित्तथरारक घटना बुधवारी सकाळी सांगलीत कृष्णामाई घाटाजवळ घडली. यावेळी जलतरणपटू शरद राजदीप यांचा जीव थोडक्यात बचावला.

    रायगडमध्ये इमारतीत शिरली भलीमोठी मगर, बघ्यांची गर्दी होताच गोंधळली, पुढे काय झालं…; पाहा VIDEO

    सांगली शहरातून कृष्णा नदी वाहते. याठिकाणी असणाऱ्या स्वामी समर्थ घाट आणि सरकारी घाटावर असंख्य लोक दररोज सकाळी पोहण्यासाठी येत असतात. जलतरणपटू शरद रायदीप हे सुद्धा रोज कृष्णा नदीतून पोहण्याचा सराव करतात. सांगलीचा बायपास रस्त्यावरील नवा पूल ते बंधारा या भागात अजस्त्र मगरींचा नेहमीच वावर असतो. दररोज एक मगर त्या मार्गाने पाण्यातून फिरताना लोकांना दिसत असते. वास्तविक मगर हा निशाचर प्राणी असला तरी पाण्यात त्याचा कायम वावर असतो आणि उन्हाच्या वेळेला निर्मनुष्य ठिकाणी मगर उन्हं खात सुस्तावलेली असते. सांगलीवाडीकडील बाजूस एका मळीत एका अजस्त्र मगरीचा ठिकाणा आहे. मात्र, या मगरीचा वावर लोकांना सवयीचा असल्यामुळे त्याबाबत आश्चर्य वाटत नाही. आज बुधवारी सकाळी शरद राजदीप हे कृष्णा नदीत सांगलीवाडीकडील बाजूने त्याच मार्गाने पोहण्याचा सराव करत होते.

    मगर आली अन् एका झटक्यात चिमुकल्याला पाण्यात घेऊन गेली, दुर्दैवी वडील बघतच राहिले

    माई घाटाच्या जवळ शरद राजदीप पोहोत येत असताना नेमक्या त्यांच्या विरुद्ध बाजूने एक अजस्त्र मगर पोहोत येत असल्याचे लोकांनी पाहिले. त्यामुळे राजदीप यांना सावध करून मार्ग बदलण्यासाठी लोक जोरजोराने आरडाओरडा करू लागले. लोक इतके ओरडत होते की कोणीही सहज तो आवाज ऐकूनच गडबडले असते. मात्र, कानात एअर प्लग घातलेला असल्याने आणि पाण्यात मान खाली घालून पोहण्याचा शरद राजदीप यांचा सराव असल्याने लोकांचा आवाज शरद राजदीप यांच्या कानावर पोहोचलाच नाही किंवा आपल्यासमोर अगदी जवळ अजस्त्र मगर पोहत येत आहे याचा त्यांना पत्ताही लागला नाही. आपल्याच सरावात तल्लीन होत ते मगरीच्या जवळ जवळ जात राहिले. लोक ओरडतच होते. अजस्त्र मगरीचे पाण्यावर आलेले नाक त्यांना दिसत होते.‌ आता पोहणाऱ्याचे काही खरे नाही. आता मगर झडप घालणार आणि शरद राजदीप मगरीच्या जबड्यात जाणार असे लोकांना वाटू लागले. पण पोहोणारा असहाय मानव समोर असतानाही मगर स्वतःच पाण्याखाली निघून गेली. या सगळ्याचा राजदीप यांना पत्ताही नव्हता. राजदीप कांबळे आपल्याच गतीने मगरीवरून पोहत पुढे गेले. ऐनवेळी हिंस्त्र मगरीने सुद्धा शांततेने आपला मार्ग कापणे पसंत केल्यामुळे एका माणसाचा जीव वाचला.

    हॉर्नच्या आवाजाने नदीत उडी मारली अन् बैल मगरींच्या तावडीत सापडला, पाहा सुटकेचा थरार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed