• Sat. Sep 21st, 2024

सिमेंट-वीटा, टाईल्सने भरलेल्या ट्रकचा अपघात, १२ तासांनी चालकाची बॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर

सिमेंट-वीटा, टाईल्सने भरलेल्या ट्रकचा अपघात, १२ तासांनी चालकाची बॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर

नाशिकः नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोटंबी घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नाशिक पेठ महामार्गावरील या घाटात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा घाटातील वळणावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की १४ टायरी ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३००३ हा गुजरातमधून सिमेंटविटा व टाइल्स भरून नाशिककडे येत होता. त्यावेळी कोटंबी घाटातील अपघाती वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे लगतच्या खडुयात ट्रक कोसळला आणि ट्रकमधील सिमेंट विटा व टाइल्स ह्या ट्रक चालकाच्या केबिनवर आल्या टाइल्स आणि विटांचा भार जास्त असल्याने केबिन तुटली आणि ट्रकचालक मालाच्या ढिगार्‍याखाली दबला गेला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अवघ्या तीन सेकंदात होत्याचं नव्हतं, Sports Bike अपघातात पिंपरीचा चिमुकला ब्रेन डेड, कुटुंबाच्या निर्णयाने सात आयुष्य उजळली

तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक चालकाचा मृतदेह हा ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आला. बालामुरुगन सुब्रमणी (वय ४४) रा.जि. नामक्कल तामिळनाडू असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर क्लिनर संकर राजेद्रन याने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मुलगी घरी वाट बघत होती; काम आटपून घरी निघाले, वाटेतच अनर्थ घडला अन् लाडका बाबा दुरावला

नाशिक पेठ महामार्गावरील कोटांबी घाटात अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे हा घाट अपघातांचा सापळा बनत चालला आहे. कोटंबी घाटातील वळण हे अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे. दर काही दिवसांनी या ठिकाणी मोठे अपघात होत असतात घाटातील रस्ता अरुंद असून या ठिकाणी प्रशासनाने उपाययोजना कराव्या अशी मागणी कोटंबी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed