• Thu. Nov 28th, 2024

    मराठा आंदोलनाचा फटका; पुण्यातून जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द, २८ ते ३० हजार प्रवाशांना त्रास

    मराठा आंदोलनाचा फटका;  पुण्यातून जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द, २८ ते ३० हजार प्रवाशांना त्रास

    पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यभर जाणवू लागली आहे. तलाठी भरतीसाठी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला, त्या सोबत सामान्य नागरिकांनाही एसटी पूर्वपदावर येण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागली. मात्र तीन दिवसांच्या रद्द झालेल्या एसटीच्या फेऱ्यामुळे मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.

    सलग तीन दिवसांपासून बस सेवा विस्कळीत झाल्याने छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, जळगाव, बीड या मार्गावरील बस सोडलेल्याच नाहीत. यामुळे तीन दिवसांत सुमारे ३० हजार फेऱ्या रद्द झाल्या आहेत. विविध भागांत आतापर्यंत १९ बस गाड्यांना आग लावली गेली. या तीन दिवसांत एसटीचे सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी देखील अनेक फेऱ्या रद्द झाल्या. वाकडेवाडीहून प्रवास करणाऱ्या सुमारे २८ ते ३० हजार प्रवाशांना याचा फटका बसला आहे. अशी माहिती ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली आहे.

    औरंगाबाद येथे तलाठी भरतीची परीक्षा होती. दरम्यान मराठा आरक्षणाचा मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने केले पाहिजे होता. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग निवडावा लागला. या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने केला पाहिजे होता मराठा आंदोलनकर्त्याची भेट घेऊन आंदोलन शांत करण्याची गरज होती. मात्र ते काही केलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागला.- बळीराम डोळे, विद्यार्थी प्रतिनिधी

    मराठा आंदोलनाचा एसटी विभागाला फटका, तीन दिवसांत कोटयवधीचं नुकसान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed