• Tue. Mar 17th, 2026

    मुलाचं वय १८ अन् प्रेयसीचं १७, प्रेमाची स्वप्न पाहिली पण…; नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना

    मुलाचं वय १८ अन् प्रेयसीचं १७, प्रेमाची स्वप्न पाहिली पण…; नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी घटना

    नागपूर : नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे पारशिवनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पेंढरी इथे प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गौरव राजेंद्र बघमारे (१८) व तन्वी (वय १७, बदललेले नाव) , अशी मृतकांची नावे आहेत. गौरव नुकताच १२ वी उत्तीर्ण झाला असून, तो सावनेर येथील आयटीआयत शिकत होता. तन्वी ही १२ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती.

    चंद्रावर जाणाऱ्या पाकिस्तानी तरुणाचा VIDEO व्हायरल, लोक म्हणाले – ही आयडिया भारीये…
    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षापासून गौरव व तन्वीचे प्रेमसंबंध होते. सोमवारी रात्री दोघांनी उशिरारात्रीपर्यंत व्हॉट्सअॅप चॅट केलं. या दरम्यान, त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. दोघेही रात्री गौरच्या घराजवळील कोणी राहात नसलेल्या घरात गेले. तिथे दोरी बांधून दोघांनी गळफास घेतला.

    मंगळवारी सकाळी एका नागरिकाला घराचा दरवाजा उघडा दिसला. नागरिक घरात गेला असता दोघेही त्याला गळफास लावलेले दिसले. त्याने पारशिवनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी दोघांचे मृतदेह पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रेमाला विरोध होण्याच्या शक्यतेने दोघांनी आत्महत्या केल्याची सांगण्यात येते. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    Moon Mystery : पृथ्वीपासून चंद्र दरवर्षी लांब पळतोय? वाचा काय आहेत चांदोमामाचे रहस्य आणि याची कारणे…

    विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
    आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करा – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
    कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदत जाहीर करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed