• Mon. Nov 25th, 2024

    विद्यापीठ प्राध्यापक भरतीप्रकरणी चौकशी समिती; प्रक्रियेबाबत महिनाभरात अहवाल देणार

    विद्यापीठ प्राध्यापक भरतीप्रकरणी चौकशी समिती; प्रक्रियेबाबत महिनाभरात अहवाल देणार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होऊ घातलेल्या ७३ प्राध्यापक भरती प्रकिया प्रकरणी आक्षेपानंतर उच्च शिक्षण संचालकांनी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे प्रकिया अडचणीत सापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    विद्यापीठाने प्राध्यापकांची ७३ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी नुकतीच जाहीरात प्रसिद्ध करून इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. पंधरा वर्षानंतर प्राध्यापकांची भरती होत आहे. याप्रकरणी विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्र ऑल बहुजन टिचर्स असोसिएशन यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, कुलपतींचे नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप आदींनी त्यावर आक्षेप घेतला आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ संपायला केवळ चार महिने बाकी आहेत. त्यामुळे ही भरती स्थगित करुन नवीन कुलगुरुंच्या कार्यकाळात करावी अशी मागणी करण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालकांकडे याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी तक्रारींच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या पदभरतीची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. विद्यापीठ प्रशासनानेही शिक्षण संचालकांनी काढलेल्या या पत्राला दुजोरा दिला.
    विद्यार्थ्यांच्या गुणदानात हलगर्जीचा ‘अवगुण’ महागात; प्राध्यापकांचा दंड लाखोंच्या घरात जाणार
    दोन सदस्यीय समिती

    उच्च शिक्षण संचालकांनी दोन सदस्य समिती नेमली असून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला द्यावा लागणार आहे. समितीत मुंबईचे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे आणि नागपूर येथील विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांचा समावेश आहे. तक्रारीतील मुद्यांच्या अनुषंगाने समिती चौकशी करेल, अहवाल सादर करेल असे पत्रात म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *