• Sat. Sep 21st, 2024

आधी फी वसुली नंतर प्रवेशबंदी; विद्यापीठाने परवानगी न दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले

आधी फी वसुली नंतर प्रवेशबंदी; विद्यापीठाने परवानगी न दिल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले

म. टा. वृत्तसेवा जव्हार :जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यासाठी शिक्षणाची पंढरी म्हणून जव्हारमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओळखले जाते, परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४मध्ये १७ अतिरिक्त आदिवासी विद्यार्थ्यांचे विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला तात्पुरते घेण्यात आलेले प्रवेश महाविद्यालयाने रद्द केले आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

जव्हार महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला मुंबई विद्यापीठाची १२० विद्यार्थी प्रवेशमर्यादा आहे. मात्र जव्हारसहित तीन तालुक्यांचा भार या महाविद्यालयावर असल्याने मर्यादित प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशासाठी येत असतात. बऱ्याचदा या महाविद्यालयातील अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून प्रस्ताव देऊन मुंबई विद्यापीठाने शिक्षणाची संधीही दिली आहे, मात्र यावर्षी विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला नियोजित प्रवेशक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मुंबई विद्यापीठाने परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

सन २०२३ ते २०२४मध्ये जव्हार महाविद्यालयाने १७ अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रवेश शुल्क घेऊन प्रवेश दिला होता. सुमारे तीन ते चार आठवडे हे विद्यार्थी दररोज महाविद्यालयात येत होते, परंतु अचानक मुंबई विद्यापीठाने वाढीव विद्यार्थीसंख्येला मंजुरी न दिल्याने जव्हार महाविद्यालयाकडून अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व शुल्क परत देण्यात आले.

न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या हक्कासाठी आम्ही लढत राहणार; लवासा प्रकल्पग्रस्तांची भूमिका

महाविद्यालयाला जर अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशाबद्दल शाश्वती नव्हती तर, विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी घेणे उचित नव्हते. सुरुवातीलाच प्रवेश नाकारला असता, तर या विद्यार्थ्यांनी अन्य ठिकाणी प्रवेशासाठी प्रयत्न केले असते, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असते.

– राजाराम पारधी, पालक

दरवर्षीप्रमाणे अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता मंजुरी मिळण्यासाठी मुंबई विद्यापीठाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता, परंतु मुंबई विद्यापीठाने अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत.

– डॉ. एम.आ र. मेश्राम, प्राचार्य, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, जव्हार

Maratha Morcha: पोलिसांच्या लाठीमारामुळे मराठा समाज पेटला, बाजू सावरण्यासाठी डॅशिंग IPS सराटी गावात जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed