• Sat. Sep 21st, 2024

चिमुकल्या भावाला वाचवलं पण भावनिकचा अंगठा तुटला, आईसह डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ सार्थकी

चिमुकल्या भावाला वाचवलं पण भावनिकचा अंगठा तुटला, आईसह डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ सार्थकी

शिल्पा नरवाडे, नवी मुंबई : लहान मुलं घरात असली की त्यांची काळजी ही डोळ्यात तेल घालून घ्यावी लागते. मात्र, नजर चुकीनं धावपळीत जर मुलांकडे दुर्लक्ष झाले तर काहीतरी विचित्र घडणार हे पक्के . लहान मुलं ही खूपच करामती असतात जो पर्यंत त्यांना चांगले वाईट समजत नाही तोपर्यंत नको त्या गोष्टी घडतात आणि त्यामुळं आई वडिलांनाही खूप काळजी असते. लहानपण म्हणजे मनोसक्त खेळणं बागडण्याचे वय, प्रत्येकाला हवं हवंसं वाटत. मात्र याच वयात खेळण्याच्या नादात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पनवेल शहरामध्ये अशीच एक घडली आहे. मोठ्या भावानं छोट्या भावाचा जीव वाचवला. पण त्यामध्ये त्याचा अंगठा तुटला डॉक्टरांनी उपचार करुन तो पुन्हा बसवून कुटुंबीयांना दिलासा दिला.

कसा घडला हा प्रकार?

पनवेल मधील फॉर्म्युन कॅलिप्सो या बहुमजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भावनिक कुमार आणि मानविक कुमार हे दोघे भाऊ त्यांच्या परिवारासह राहत होते. बुधवारी दुपारच्या वेळी हे दोघे भाऊ खेळत होते. मात्र अचानक मानविक घराबाहेरील लिफ्टच्या दिशेने धावत सुटला आणि लिफ्ट मध्ये शिरला. मोठा भाऊ भावनिक याच्या लक्षात येताच त्याने पळतच लिफ्ट गाठलं, मोठा भाऊ लहान भावाला वाचवायला गेला मात्र या धावपळीमध्ये त्याचा हात लिफ्टच्या दरवाज्यामध्ये अडकला आणि हाताचा अंगठा बाजूला पडला. वेदनेच्या भरात भावनिक जोरजोरात आरडा ओरडा करू लागला. मुलाचा आवाज ऐकून आई धावतच आली तर मुलाच्या हाताचा अंगठा तुटलेल्या अवस्थेत दिसला.
उच्चस्तरीय चौकशीसह दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत; तुम्ही शांतता राखा, अजित पवार यांचे आवाहन
आईनं क्षणाचाही विचार न करता आहे त्या अवस्थेमध्ये रहिवाशांची मदत घेऊन जवळील स्थानिक रुग्णालय गाठले, मात्र स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी अंगठा नीट ठेवत प्रत्यारोपणा साठी जे जे रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार भावनिकच्या आई वडिलांनी जे जे रुग्णालय गाठले. यावेळी प्लॅस्टिक सर्जरीच्या डॉक्टरांनी सर्व मूलभूत चाचण्या करून गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंगठ्याच्या प्रत्यारोपण ऑपरेशनास सुरुवात केली आणि अखेर सकाळी ७ वाजता ऑपरेशन यशस्वी झाले.
भारत-पाकिस्तान सामन्यात ही गोष्ट पहिल्यांदाच घडली, आशिया कपमध्ये नेमकं घडलं तरी काय पाहा…
मुलाचे अंगठयाचे प्रत्यारोपण ऑपरेशन व्यवस्थित झाल्यावर आईच्या जीवात जीव आला. भावनिक हा पहिलीच्या वर्गामध्ये शिकत होता त्याच वय लहान असल्याने आईची चिंता वाढली होती. दैव बलवत्तर म्हणून मुलाचा जीव वाचला आणि अंगठयाचे प्रत्यारोपण ऑपरेशन यशस्वी झाले.

आंदोलनाबद्दल समाजामध्ये आस्था, ते हाताबाहेर जाऊ देऊ नका, शरद पवारांचा मनोज जरांगेंना मोलाचा सल्ला

शिवसेनेत दोन गट; ठाकरे गटात बहिण, भाऊ शिंदे गटात; रांग लावून आमदार भावाने बांधली बहिणीकडून राखी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed