• Sat. Sep 21st, 2024
चौघे सहलीसाठी आले; धरणात पोहण्याचा मोह आवरला नाही, पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ, अन्…

पुणे: भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार, रविवार असल्याने अनेक जण पर्यटनासाठी पाण्याच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. मात्र यावेळी काही अपघात घडतात. अशीच एक घटना समोर आली आहे. पुण्यातून भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरणाच्या बॅक वॉटरला असणाऱ्या नऱ्हे येथे पर्यटनासाठी आलेल्या चौघांपैकी एकाचा भाटघर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
आईवडील कामासाठी गेले; तरुणाचे धक्कादायक पाऊल, क्लासवरून बहीण घरी आली, दरवाजा उघडताच…
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य अशोक केदारे (२४, रा.हांडेवाडी, सासानेनगर, हडपसर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो हडपसर येथील राहणारा आहे. पाण्यात बुडाल्याने नंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र आज सायंकाळीच त्याचा मृतदेह सापडला आहे. चौघांचा ग्रुप या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुट्टी असल्याने हडपसर परिसरातील दोन मुलं आणि दोन मुली असे चौघेजण भोर तालुक्यातील नरहे येथे भाटघर धरणाच्या बॅक वॉटर येथे पर्यटनासाठी आले होते.

पिकनिकसाठी आलेल्या चार मित्रांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

त्यातील तरुणींना पोहण्याचा मोह अवराला नाही. त्यामुळे त्यांनी नऱ्हे येथील भैरवनाथ तालीजवळ पोहण्यासाठी दोघे जण पाण्यात उतरले. त्यात आदित्य याला पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत राजगड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी देखील घटनास्थळी दाखल होत भोईराज जलआपत्ती पथकाला बोलावण्यात आले. त्यानंतर या पथकाने या तरुणाचा शोध घेतला. काही वेळात या तरुणाला शोधण्यात यश आले. पोलिसांकडून या संदर्भात अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed