• Sat. Sep 21st, 2024
मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला प्रकरण चिघळलं; जालन्यातील घटनेचे बीडमध्ये पडसाद, जिल्हा बंदची हाक

बीड: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर उद्या बीड जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे त्याचबरोबर मराठा समाजातील अनेक नागरिकांनी आक्रमक होत उद्या बीड जिल्हा बंद असल्याची हाक दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत होते. मात्र आज सायंकाळी या उपोषणस्थळी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्याचे पडसाद संपुर्ण राज्यात पडत असून याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
अंतरवाली घटनेचे पडसाद; शरद पवारांनी गृहखात्यावर साधला निशाणा, म्हणाले- अतिरेकी भूमिका घेतली गेली
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. मात्र बीड जिल्ह्यात उद्या बीड बंद असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी अजून किती लढत द्यायची आणि किती माणसं मरणार जर आता तोडगा मिळाला नाही हे वेगळ्या पद्धतीने करण्यात येतील. मात्र आता शासन प्रशासन आणि सरकारने याची दखल घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. आम्हाला हिंसकता नकोय मात्र आरक्षण हवे. मात्र यामध्ये देखील जर अशा पद्धतीचे लाठी चार्ज होत असतील तर याची चौकशी होणं देखील गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले.

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी, तुमचं वैफल्य जनतेवर काढू नका | संजय राऊत

दरम्यान अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते उपोषणासाठी बसले होते. त्यांना काल रात्री पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला. तो गावकऱ्यांनी हाणून पाडला होता. पण आज दुपारी पुन्हा पोलिसांनी उपोषणकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर प्रकरणाला हिंसक वळण मिळाले आणि पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे आता संपुर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed