• Sat. Sep 21st, 2024

घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले

घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले

सातारा : नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त तोरण बांधत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. संदीप बाजीराव वायदंडे (वय ३९ वर्ष) असं मयत तरुणाचं नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने मातंग समाजावर दुःखाची छाया पसरली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मसूरमधील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव वायदंडे यांचा संदीप हा कनिष्ठ चिरंजीव होता. मसूरजवळील शहापूर येथे त्याच्या दुकानाशेजारी सीमा लक्ष्मण मंदुळकर यांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त सोमवारी सकाळी घटाला तोरण बांधण्यासाठी संदीप गेला होता. तोरण बांधत असताना घराजवळून गेलेल्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. संदीप याचा मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

माणुसकी लाजली! पतीचं पार्थिव ज्या रुग्णवाहिकेने नेलं, त्या ड्रायव्हरनेच दिली चोरीची टीप
मातंग समाजातील अत्यंत कष्टाळू, सतत हसतमुख, निर्व्यसनी आणि सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून संदीपला ओळखले जात होते. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. यावेळी त्याच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

ड्युटीवर जातानाच पोलिसाला हार्ट अटॅक, ऐन रक्षाबंधनाला चार बहिणींचा लाडका भाऊ कालवश
संदीप केटरिंग व भाजीपाला या व्यवसायाबरोबरच रिक्षावर कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. त्याच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, नातेवाईक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

शॉक लागलेल्या व्यक्तीला वाचवणाऱ्या मुस्लीम बांधवांचा जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ शेअर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed