नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील कासारभाट गावातील प्रियांका तांडेल या २० वर्षीय तरुणीला मोबाईल जास्त वापरते म्हणून कुटुंबातील सदस्य ओरडले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी भर दुपारी रागाच्या भरात ती घरातून निघून गेली. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि आपली मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली. मात्र आता ७ दिवसांनी आज तिचा मृतदेह समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पात्रात आढळून आला.
रात्रीच्या वेळी मच्छीमारी करताना एका मच्छीमाराला कुणा एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने त्याने जवळच्या पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्यात फोन करून सदर प्रकरणाची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित गोळे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत बोटीच्या साहाय्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. तरुणीच्या मृत्यूच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता तरुणीचा मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. रागाच्या भरात प्रियांकाने स्वत:चं आयुष्य संपवलं की तिच्यासोबत काही घातपात झाला आहे, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह असून प्रियांकाच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.