आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रोमुळे मंत्रालयातील काचा फुटल्याची घटना गुरूवार, ३१ ऑगस्टला घडली. प्रामुख्याने मंत्री सुधीत मुनगंटीवार यांच्या दालनाच्या काचांचा त्यात समावेश होता. या घटनेनंतर एकीकडे मेट्रो उभी करणाऱ्या सरकारी कंपनीने हे काम थांबवले असतानाच ज्या कंत्राटी कंपनीमुळे या काचा फुटल्या त्या कंपनीविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) ही केंद्र व राज्य सरकारी संयुक्त कंपनी मेट्रो ३ या भुयारी मार्गाची उभारणी करीत आहे. या मार्गिकेचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मात्र काही ठिकाणी स्थानकांच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीवरुन रस्ते खोदकाम सुरू आहे. याचदरम्यान मंत्रालय व विधानभवन, या स्थानकांतील प्रवेशासाठीचे खोदकाम करताना वरील घटना घडली.
संबंधितांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालय स्थानकात जमिनीवरुन प्रवेश करण्यासाठीचा मार्ग तयार होत आहे. त्याठिकाणी कठिण खडक आहे. तो फोडण्यासाठी काही दिवसांपासून तेथे स्फोट केले जात आहेत. मात्र गुरूवारी हे स्फोट काहिसे जोराने झाले. त्यामुळे मंत्रालयातील काही दालनांच्या काचा फुटल्या. तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचादेखील दगड उडून फुटल्या, असेही काहींचे म्हणणे आहे.
याबाबत एमएमआरसीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, मंत्रालय ते विधानभवन भुयारी मार्गाच्या प्रवेश/निकसाचे खोदकाम सुरू असून या कामादरम्यान कठीण खडक फोडण्यासाठी नियंत्रित स्फोट केले जात आहे.
काही दिवसांपासून हे काम कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. मात्र गुरूवारी या कामादरम्यान मंत्रालयाच्या काही खिडक्यांचे नुकसान झाले. एमएमआरसी हे काम पूर्ण जबाबदारीने करीत आहे. मात्र यानंतर आता मंत्रालयाजवळील भुयारी मार्गावर नियंत्रित स्फोटाचे काम थांबविण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेतला जाईल. स्फोटादरम्यान झालेल्या घटनेच्या कारणांचा अभ्यास करून सुधारणेनंतरच काम पुन्हा सुरू केले जाईल.