नवी मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन’ने पुढाकार घेत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. खारफुटीच्या महत्त्वाबद्दल विविध स्तरांवर जनजागृती करण्यासाठी एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनने इनरव्हील क्लब ऑफ नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनच्या सहकार्याने आज महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला. या फाऊंडेशनच्या सदस्यांनी कचरा गोळा करत त्याची राखी बनवत अनोखा संदेश दिला आहे.
‘गोळा केलेला कचरा वापरून आम्ही रक्षाबंधनाची भरीव सजावट केली. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करत आहोत. कचऱ्यामुळे जलचर आणि सागरी जीवांना हानी पोहोचते. त्यामुळे कचऱ्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि शाश्वत निवडींसाठी समर्थन करणे, हे आमचे मूळ उद्दिष्ट आहे. खारफुटी वाचवा, महासागर वाचवा,’ असं आवाहनही ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन’कडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, ऐन सणादिवशी या फाऊंडेशनकडून पर्यावरण रक्षणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.