• Sat. Sep 21st, 2024

आता रेणुका माता मार्ग दाखवेल, मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही: पंकजा मुंडे

आता रेणुका माता मार्ग दाखवेल, मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही: पंकजा मुंडे

नांदेड: माझ्या भविष्यासाठी कुलदैवत असलेल्या माहूर येथील श्री रेणुका माताच मला मार्ग दाखवेल. मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाहीये, कारण माझ्या मागे शक्ती आणि शिवचे आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. शक्तीपीठ असलेल्या रेणुका मातेच आज बुधवार पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील उपस्थित होते.

दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सक्रिय झाल्या आहेत. चार सप्टेंबरपासून त्या करणाऱ्या महाराष्ट्रातील शिवशक्ती दर्शन यात्रेची सुरवात माहूर येथील श्री रेणुकामातेच्या दर्शनाने बुधवारी करण्यात आली. दरम्यान पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या. त्यांच्या भविष्यातील राजकारणा बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पंकजा मुंडे यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी शिव दर्शन यात्रा काढण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार बुधवारी पंकजा मुंडे ह्या मुंबईहून विमानाने नांदेड विमानतळावर दाखल झाल्या, त्यानंतर त्यांनी वाहणाने माहूर येथील रेणुका मातेचं दर्शन घेतले. रेणुकामातेच्या चरणी त्या नतमस्तक झाल्या.

Sharad Pawar Retirement: शरद पवारांचे वय झाले, त्यांनी निवृत्ती घ्यावी; पुण्यात वर्ग मित्राचा सल्ला
शिवशक्ती हे मुख्य आहे, सर्व ब्रह्मांडाचा मी शिवशक्ती परिक्रमा करत आहे. श्रावण महिण्यात महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्याचा हा माझा प्रण होता आणि याची सुरुवात आमची कुलदैवत श्री रेणुका माता दर्शनाने केली आहे. आता मला रेणुका माताच सर्व काही मार्ग दाखवेल, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.

मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही

पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे नेते तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावर प्रतिक्रिया देताना मला शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या. मी माझे शक्ती प्रदर्शन दरवर्षी दाखवत असते. वर्षातून चार वेळा शक्ती प्रदर्शन दाखवते. मी रेणुका मातेच्या दर्शनाला आले आहे. माझ्या मागे देवीची शक्ती आणि शिवचे आशीर्वाद आहे. हीच माझी शिव आणि शक्ती आहे, कुणाशी माझी तुलना नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी

कुलदैवताच्या दर्शनासाठी आलेल्या भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नांदेडमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. नांदेड विमानातळावर आगमन होताच भाजपा कार्यकर्ता आणि समर्थकाकडून सत्कार करण्यात आला. अर्धापूर आणि हदगाव मध्ये देखील समर्थकाकडून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. माहूर शहरात जेसीबीने फुलांची उधळण करुण पंकजा मुंडे यांचं भव्य स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी आलेल्या समर्थकामध्ये उत्साह पहावयास मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed