• Sun. Sep 22nd, 2024
गोपीचंद पडळकरांच्या घोषणेनं एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराचे टेन्शन वाढणार? वाचा नेमकं काय म्हणाले?

सांगली: मी गेल्या तीन वर्षात केलेली कामे आजी-माजी आमदारांच्यापेक्षा जास्त आहेत. १९९० पासून त्यांनी नुसते राजकारणच केले आहे. त्यांच्यासारखे टगेगिरीचे राजकारण आम्ही कधीच केले नाही. येत्या २०२४ ची खानापूर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथे तामखडी ते ऐनवाडी २० लाख रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. युवा नेते पंकज दबडे, सरपंच दाजी पवार, विजय जाधव, उपसरपंच पल्लवी पवार, शकुंतला जगदाळे, ॲड. प्रमोद भारते, ताडाचीवाडी सरपंच सागर पवार, ढवळेश्वर सरपंच राहुल मंडले, विष्णू तुपे, विकास गवळी उपस्थित होते.
पद येत-जात असतं मात्र ‘मुंडे साहेबांची लेक’ हे पद आयुष्यभर राहणार; असं का म्हणाल्या प्रीतम मुंडे?
यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, मी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणला आहे. माझे आजी माजी दोन्ही आमदारांना चॅलेंज आहे, तीन वर्षात केलेली कामे आपल्याला चाळीस वर्षात करता आली नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टेंभू योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मी पाठपुरावा केला होता. पाठपुरावा करूनही श्रेय घ्यायला दुसरेच पुढे आले आहेत. आम्हाला कुणावर अन्याय करायचा नाही मात्र आमच्यावर कोण अन्याय करत असेल तर सहन करणार नाही. गावागावात परिस्थिती बदलली असून भाजपचा मतदार वाढला आहे.

पंतप्रधान होण्याची संधी घालवली, आता पवारांनी निवृत्त व्हावं, सायरस पुनावालांचा मित्राला सल्ला

येत्या २०२४ ची निवडणूक मी लढवणार असून ती ताकदीने लढवून जिंकणार आहे. सर्वसामान्य लोकांची मागणी असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. खानापूर तालुक्यातील गावागावात विकासकामांसाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. काही दिवसात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामे मंजूर करून घेणार आहे. मागील वर्षी माझा निधी जत तालुक्याला दिला होता यावर्षी तो खानापूर तालुक्याला देणार आहे. त्यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील गावांना निधी कमी पडणार नाही, असेही पडळकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed