• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांचं टेन्शन मिटणार, पीएमपीचं ५०० चालकांना ई-बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं प्लॅनिंग

पुणेकरांचं टेन्शन मिटणार, पीएमपीचं ५०० चालकांना ई-बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं प्लॅनिंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी ) ५०० चालकांना आता ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात ई-बस वरील चालकांनी संप केल्यास पर्यायी व्यवस्था तयार राहावी या दृष्टीने पीएमपीकडून तयारी केली जाणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण २०८९ बस आहेत. त्यामध्ये ९९१ बस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. तर, १०९८ बस या ठेकेदारांच्या आहेत. ठेकेदाराच्या बसमध्ये ६४० बस या सीएनजीवरील आहेत. तर, ४५८ ई-बस आहेत. यापैकी साधारण १७५० ते १८०० बस सध्या मार्गावर असतात. त्या बसच्या माध्यमातून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत सेवा दिली जाते. मार्गावर असलेल्या बसपैकी निम्म्यापेक्षा जास्त या ठेकेदाराच्या मालकीच्या असतात.

काही महिन्यांपूर्वी पैस थकल्यामुळे ठेकेदारांनी संप पुकारला होता. तब्बल दोन दिवस ठेकेदाराच्या बस बंद होत्या. त्यावेळी नेमकी दहावी व बारावीची परिक्षा सुरू होती. पीएमपीच्या त्यांच्या स्वमालकीच्या सर्व बस मार्गावर आणून सेवा दिली होती. तरीही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. आता पुन्हा ठेकेदाराच्या ई-बसवरील चालकांनी संप केला. त्यामुळे २०० बस मार्गावर आल्या नाहीत. यावेळी पीएमपीने धावपळ करून त्यांच्या बस मार्गावर आणल्या. यासाठी मेस्मा कायदा देखील लागू करावा लागला. पीएमपीच्या चालकांना ई-बस चालविता येत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली होती.
K L Rahul च्या जागी भारतीय संघात कोणाला मिळाली संधी, इशान की संजू जाणून घ्या…
ठेकेदारांच्या सततच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होतात. तसेच, पीएमपीची बदनामी देखील होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. त्यासाठी आता पीएमपीच्या ५०० चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. भविष्यात पीएमपीमध्ये ई-बसची संख्या वाढणार आहे.
Asia Cup 2023 मधील सामने कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर…
ठेकेदारांनी संप केल्यास त्यांच्या ई-बस ताब्यात घेऊन पीएमपी त्या ई-बस चालविणार आहे. तसेच, चालकांनी संप केल्यास पर्यायी चालकांची देखील व्यवस्था असावी, या दृष्टीने पीएमपी प्रशासन काम करत आहे. प्रवाशांची गैससोय होणार नाही याची पीएमपी प्रशासन काळजी घेत आहे.
Rohini Khadse : शरद पवारांची मोठी खेळी, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचं प्रमोशन, पक्षाकडून मोठी जबबादारी

एसटी बसचा मुंबई–ठाणे-पुणे मार्गावर १०० शिवनेरी ई बसेस धावणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed