• Mon. Nov 25th, 2024
    Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला बहिणीची भावाला अनोखी भेट, असं गिफ्ट दिलं की वाचून डोळे पाणावतील

    नवी मुंबई : भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा अनोखा प्रत्यय नुकताच समोर आला आहे. एका २१ वर्षीय बहिणीने ‘ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस’ या आजाराशी लढा देत असलेल्या आपल्या १७ वर्षीय भावासाठी यकृतदान करून रक्षाबंधनची अनोखी भेट दिली आहे. खारघर येथील मेडिकवर रुग्णालयाध्ये यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया पार पाडली.

    राहुलचे वडील संतोष पाटील हे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर त्याची आई घरकाम करते. नंदिनी ही त्यांची मोठी मुलगी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर, राहुल हा त्यांचा धाकटा मुलगा सध्या दहावीत आहे. राहुलला अचानक अशक्तपणा जाणवू लागला आणि रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा हे संपूर्ण कुटुंब घाबरले. त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे धाव घेतली. परंतु, त्याने फारसा फरक पडला नाही. अखेर ते खारघरमधील मेडिकवर रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल झाले.

    तपासणीत राहुलला ‘ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस’ असल्याचं तसेच, त्याला यकृत प्रत्यारोपणाची नितांत गरज असल्याचं निदान झालं. राहुलची आई HbsAg पॉझिटिव्ह आढळल्याने तिला दाता म्हणून नाकारण्यात आले. यावेळी राहुलची २१ वर्षीय बहीण नंदिनी पाटील यकृत दानासाठी पुढे सरसावली आणि संपूर्ण तपासणीनंतर ती त्यास पात्र ठरली.

    Crime Diary : अँकरच्या बॉडीवरून शेकडो वाहनं गेली आणि ५ वर्षांनी…; हत्येची कहाणी वाचून दृश्यम आठवेल
    राहुलच्या बहिणीने आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता तिचे यकृतदान केले. २६ जून २०२३ रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दाता आणि रुग्ण या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. ‘माझ्या भावाला नवे आयुष्य मिळाले असून आम्ही सर्वच खुप खूश आहोत,’ अशी प्रतिक्रिया रुग्णाची बहीण नंदिनी पाटील हिने दिली. तर,’माझ्या बहिणीने मला रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली. तिच्यामुळेच आज मला नवे आयुष्य मिळाले आहे,’ अशा भावना राहुलने व्यक्त केल्या

    वेळीच उपचार न केल्यास रुग्णाला जीव गमवावा लागला असता. हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते, मात्र त्यासाठी प्रत्यारोपण न थांबविता मेडिकवर रुग्णालय आणि इतर सेवाभावी संस्थांनी मदत केली. निरोगी व्यक्ती कोणत्याही नकारात्मक परिणामांशिवाय त्यांचे यकृत सुरक्षितपणे दान करू शकते, असे खारघर येथील मेडिकवर रुग्णालयाचे संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले.

    Accident News : शव घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, आणखी एकाने जागीच गमावला जीव

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *