• Sat. Sep 21st, 2024
सेल्फी काढताना तोल गेला, मुलाला वाचवण्यासाठी बापाची उडी; समुद्राच्या पाण्यात बाप-लेकाचा अंत

पालघर : समुद्रकिनार्‍यावर गेलेले वडील आणि मुलगा समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना वसई किल्ला परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. १४ वर्षांचा मुलगा सेल्फी काढताना तोल जाऊन समुद्रात पडला व त्याला वाचवण्यासाठी गेलेले वडील देखील समुद्रात बुडाले शैलेंद्र मोरे (वय ४२) आणि देवेंद्र मोरे (वय १४)अशी या पिता पुत्राची नावे आहेत.

शैलेंद्र मोरे (वय ४२) यांचा दातांचे उपकरणे तयार करण्याचा व्यवसाय असून ते त्यांची आई आणि १४ वर्षाचा मुलगा देवेंद्र यांच्यासोबत वसई पश्चिमेकडील ओमनगर परिसरात राहतात. शैलेंद्र यांनी रविवारी त्यांच्या घरी स्वामी समर्थांचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूजा संपल्यानंतर पूजेतील निर्माल्य समुद्रात विसर्जित करण्यासाठी त्यांचा १४ वर्षांचा मुलगा देवेंद्रला सोबत घेऊन शैलेंद्र मोरे वसई किल्लानजीक समुद्रकिनारी गेले होते.

Loksabha Election 2024: भाजपने देशातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक केलेत, लोकसभा निवडणूक डिसेंबरमध्ये: ममता बॅनर्जी
पूजेतील निर्माल्य समुद्रात विसर्जित केल्यानंतर देवेंद्र समुद्रकिनारी असलेल्या जेटीवर मोबाईल घेऊन सेल्फी काढत होता. मात्र, सेल्फी काढताना तोल गेल्याने देवेंद्र पाण्यात पडला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वडील शैलेंद्र यांनी धावत जात समुद्राच्या पाण्यात उडी मारली. मात्र, पिता व पुत्र दोघेही समुद्राच्या पाण्यात बुडाले. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या एका इसमाच्या निदर्शनास येताच त्याने तात्काळ वसई पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत समुद्रात बुडलेल्या पिता-पुत्राचा शोध सुरू केला. मात्र, समुद्रात बुडालेले हे दोघे नेमके कोण याबाबत माहिती मिळत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी व तपास करून शैलेंद्र मोरे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. दरम्यान, शैलेंद्र मोरे यांचा मृतदेह नायगाव खाडीकिनारी सोमवारी रात्रीच्या सुमारास आढळून आला असून मुलगा देवेंद्रच्या मृतदेहाचा शोध अद्याप सुरू आहे.

Pune News: अजित पवार-चंद्रकांतदादांमध्ये कोल्डवॉर, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, वाचा नेमकं काय घडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed