• Sat. Sep 21st, 2024
आई गेली कामाला; घरी मुलगी एकटीच, घरात कोणी नसल्याचा फायदा घेतला अन् नको ते…

सोलापूर: सोलापुरातील एका व्यक्तीने नववीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करून आलेल्या व्यक्तीने घरात कोणी नसल्याचे पाहून घराचे दार बंद केले. त्यानंतर नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी रविवारी जोडभावी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
काकाकडे राहायला आली; मात्र चुलत भावाचे गैरकृत्य, बहीण गर्भवती, वडील म्हणाले लग्न कर तर…
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई शिलाईचे काम आणि मजुरी करते. मायलेकीची गुजराण शिलाईवरच चालते. काही वर्षांपूर्वीच पीडितेच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती इयत्ता नववीमध्ये शिकते. शनिवारी तिची आई कामासाठी बाहेर गेली होती. पीडितेच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती फाटलेला शर्ट शिवायचा आहे म्हणून घरात आला. पीडितेने त्याला आई कामाला गेली आहे त्यामुळे नंतर या, असे सांगितले. याचवेळी त्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार आला. त्याने घराचे दार बंद करून या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

अल्लाह, तुझ्या कृपेची बरसात होऊ दे, दुष्काळ संपून पाऊस बरसू दे; मुस्लिम बांधवांचं सामुहिक नमाज पठण

अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने पीडितेला धमकी दिली. ही गोष्ट आईला सांगितली तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडिता ही दिवसभर घाबरलेल्या अवस्थेत होती. नववीतल्या मुलीला असह्य वेदना होत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास पीडितेची आई घरी आली. तेव्हा तिने घाबरून काही सांगितले नाही. पिडीता ही शनिवारी दिवसभर असह्य वेदना सहन करत होती. शनिवारी रात्री १० वाजता झोपेतून उठून तिने रडत सगळा प्रकार आईला सांगितला. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शर्ट शिवण्याचा बहाणा करून अत्याचार केला. पीडितेच्या आईने रविवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या नातलगांशी चर्चा करून पीडिता आणि तिच्या आईने जोडभावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. जोडभावी पेठ पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा अधिक तपास महिला फौजदार संगीता व्हट्टे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed