• Thu. Mar 12th, 2026

    चिमुकली घरात खळत होती, तर बाप पलंगावर आराम करत होता; अचानक घर कोसळलं अन् दोघांचाही मृत्यू!

    चिमुकली घरात खळत होती, तर बाप पलंगावर आराम करत होता; अचानक घर कोसळलं अन् दोघांचाही मृत्यू!

    नागपूर : वेकोलिच्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटांनी घर कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास कन्हानमधील हरीहरनगर येथे घडली. कमलेश गजानन कोठेकर (वय ३२) व यादवी कमलेश कोठेकर (वय ५) ,अशी मृतकांची नावे आहेत. कमलेश यांचे धर्मराज शाळेसमोर सलून असून, यादवी ही शिक्षण घेत होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश हे दुपारी यादवीला शाळेतून घेऊन घरी आले. कमलेश हे पलंगावर आराम करीत होते. तर यादवी ही घरात खेळत होती. दरम्यान खाणीत स्फोट झाले. त्यामुळे हरिहरनगर हादरले. कोठेकर यांचे घर कोसळले. कमलेश व यादवी हे दोघे ढिगाऱ्याखाली दबले. शेजाऱ्यांनी धाव घेतली. कन्हान पोलिसांनाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार सार्थक नेहते यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहाचेला. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी अवस्थेत कमलेश व यादवीला ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

    शिर्डीच्या जागेवरुन नवा पेच, मातोश्रीवर खडाजंगी;बबनराव घोलप तातडीनं उद्धव ठाकरेंच्या भेटीला, काय घडलं?

    दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात दोघांना दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed