• Sat. Sep 21st, 2024

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी; थकित वेतनाबाबत मोठा निर्णय

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी; थकित वेतनाबाबत मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे शहराची दैनंदिन साफसफाई करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळवण्याचा मोकळा झाला आहे. तब्बल ४५ सफाई कामगारांना थकीत तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन मिळणार आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे पालिकेने सफाई खात्यात ठेकेदाराच्या माध्यमातून ४५ हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून वेतन दिले जाते. मात्र, तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचारी हवालदील झाले होते. या ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही सरकारकडे जमा केलेली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी ठाणे पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. वेतन न मिळालेले कामगार प्रवेशद्वारावर आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, नारायण पवार आणि परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील यांनी कामगारांची व्यथा समजूत घेत पालिकेच्या घनकचरा विभागात धाव घेतली. याठिकाणी उपायुक्त तुषार पवार यांची भाजपच्या शिष्टमंडळाने कामगारांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घेतली. कंत्राटी सफाई कामगारांचे तातडीने वेतन देण्याबाबत विनंतीही यावेळी केली. अखेर उपायुक्त तुषार पवार यांनी येत्या मंगळवारी दोन महिन्यांचे वेतन कामगारांना देणार असल्याचे आश्वासन दिले.
नाशिककरांनो पाणीपट्टी भरली की नाही? १ सप्टेंबरपासून महापालिका थेट नळ कनेक्शन तोडणार
१ सप्टेंबरपासून नव्या कंत्राटदाराची नियुक्ती

सफाई कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरल्यानंतर उर्वरित वेतनही दिले जाणार आहे. संबंधित ठेकेदाराऐवजी येत्या १ सप्टेंबरपासून नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटदाराकडे सध्याच्या कर्मचाऱ्यांना वर्ग केले जाणार आहे. या निर्णयामुळे कामगारांची वेतन चणचण मिटणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed